________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
दादाश्री : ती दृष्टी तर आपल्याला प्राप्त झाली आहे. दुसऱ्यांना प्राप्त झालेली नसते पण आपल्याला तर प्राप्त झाली आहे ना, की ही चूक झाली, आपली चूक लक्षात येते. आपली जागृती अशी आहे की, सगळ्या चुका दाखवते. थोड्या-थोड्या दिसतात, जसजसे आवरण सरकत जाते तसतसे दिसू लागतात.
जेव्हा घरातील सर्व माणसे निर्दोष दिसतात आणि मात्र स्वत:चेच दोष दिसतात तेव्हा खरी प्रतिक्रमणे होतात.
अशी होतात कर्म चोख प्रश्नकर्ता : महात्म्यांची अशी स्टेज (स्थिति) केव्हा येईल की, प्रतिक्रमण करावेच लागणार नाहीत?
दादाश्री : अँटेक करणे विसरेल तेव्हा प्रतिक्रमण करायला विसरेल. प्रश्नकर्ता : जुन्या दोषांचे प्रतिक्रमण कुठपर्यंत करावेत?
दादाश्री : दोष असतील तोपर्यंत. आणि आपल्या दोषामुळे समोरच्या व्यक्तीला दुःख होत असेल तरच म्हणावे, 'चंदुलाल याचे प्रतिक्रमण करा' अन्यथा प्रतिक्रमण करण्याची गरज नाही.
__ प्रश्नकर्ता : ह्या जन्मात असे काही दोष केलेले नसतील, परंतु भुतकाळात, पूर्वीच्या जन्मी असे काही दोष केले असतील की ज्यांचे प्रतिक्रमण करुन त्यातून सुटायचे असेल तर ते प्रतिक्रमण कसे करावे? आणि कुठपर्यंत करावे?
दादाश्री : मागच्या जन्मी झालेले दोष आपल्याला कसे समजणार? जो क्लेम करत असेल त्याचे निवारण होऊ शकते पण कोणी क्लेम करत नसेल तर? म्हणजे जो क्लेम करत असेल त्याचे प्रतिक्रमण करावे. दुसऱ्या कुणाशी काही देणघणे नाही. ज्याची आठवण येत असेल, ज्याच्यासाठी आपले मन बिघडत असेल, त्याचे प्रतिक्रमण