________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर....
आहे,' हे समजल्यानंतरच निष्पक्षपाती होता येते. जेव्हा कुणाचा सहजही दोष दिसत नाही, आणि स्वतःचे सर्वच दोष दिसतात तेव्हा स्वतःचे काम पूर्ण झाले असे म्हटले जाते. यापूर्वी तर 'मीच आहे' असेच भान होते. त्यामुळे निष्पक्षपाती झाले नव्हते. आत्ता निष्पक्षपाती झालात म्हणून स्वत:चे सर्वच दोष दिसणे सुरु होते आणि उपयोग आतच वळलेला असतो, त्यामुळे दुसऱ्यांचे दोष दिसत नाहीत! स्वतःचे दोष दिसण्यास सुरुवात झाली म्हणजे ‘हे’ ज्ञान परिणमित होण्यास सुरुवात होते. स्वतःचे दोष दिसण्याची सुरुवात झाली म्हणजे दुसऱ्यांचे दोष दिसत नाहीत. या निर्दोष जगात कोणीच दोषी नाही. मग कोणाला दोष देणार ? दोष हा अहंकाराचा भाग आहे आणि जोपर्यंत हा भाग धुतला जात नाही तोपर्यंत सर्व दोष निघणार नाहीत, आणि तोपर्यंत अहंकाराचे निमूर्लन होणार नाही. अहंकाराचे निमूर्लन होईपर्यंत दोष धुवायचे आहेत.
तसतसा प्रकट होतो आत्मप्रकाश
७१
प्रश्नकर्ता : आत्म्याचा अध्यास झाल्यानंतर चुका आपोआपच कमी होऊ लागतात का ?
दादाश्री : नक्कीच, चुका कमी होणे याचेच नाव आत्म्याचा अध्यास. देहाध्यास जातो तसतसे हे उत्पन्न होते.
आधी समकित होते, पण तरीही सर्व दोष दिसत नाहीत असे समकित होते. त्यानंतर मग जागृती वाढत जाते, तसतसे स्वतः चे दोष दिसू लागतात! स्वतःचे दोष दिसतात त्यास क्षायक समकित म्हटले जाते. असे क्षायक समकित आम्ही इथे लोकांमध्ये मोफत लुटवत असतो. फक्त मोफतच नाही, तर उलट आम्ही म्हणतो की तुम्ही इथे या, चहा सुद्धा पाजतो, तरीही येत नाहीत पाहा ना, आश्चर्यच आहे ना !
या चुका दिसू लागल्या म्हणून आपण सांगावे, 'अहो चंदुभाऊ ! तुम्ही अतिक्रमण केले, म्हणून प्रतिक्रमण करा' जगात कुणालाही स्वत:ची चूक दिसत नाही. ज्याला स्वतःची चूक दिसते, त्यास म्हणतात समकित.