________________
१२८
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दादाश्री : आता हे उदाहरण कोणाला माहीत नाही का ?
प्रश्नकर्ता : माहीतच असेल.
दादाश्री : नाही, हे त्यांना कसे लक्षात येईल ? दिवसभर लक्ष लक्ष्मीजीवरच असते. आणि लक्ष्मीचा विषय संपला की बाईसाहेबांची आठवण येते. आणि बाईसाहेबांचा विषय संपला की पुन्हा लक्ष्मीचा विषय आठवतो. त्यामुळे दुसरे काही लक्षातच नाही राहत ना ! मग दुसरे हिशोब काढण्याचे राहूनच जाते ना ?
आम्ही सोनाराला पाहिले आहे, मला असे वाटायचे की हा सोनार रागवत का नाही की, 'तुम्ही सोने का बिघडवून आणले ?' त्याची दृष्टी कशी सुंदर आहे! अजिबात रागवत नाही. याचे सोने चांगले आहे असेही कधी बोलत नाही. पण असे म्हणतो 'बसा, चहा-पाणी घ्याल ना ?' अरे, भेसळयुक्त सोने आहे तरीही चहा पाजतोस ? तर यात सुद्धा असेच आहे. आत तर शुद्ध सोनेच (शुद्ध आत्माच ) आहे ना ? तात्विक दृष्टीने पाहिले तर कुणाचाही दोष नाही.
जग निर्दोष, पुराव्यासकट
आम्ही संपूर्ण जग निर्दोष पाहतो. आम्ही जगाला निर्दोष मानले आहे. ते मानलेले थोडेच बदलणार आहे ? घटक्यात बदलेल का ? आम्ही निर्दोष मानले आहे, जाणले आहे, मग दोषी थोडेच वाटणार आहे ? !
कारण जगात कोणीही दोषी नाहीच. मी एक्जॅक्टली (जसे आहे तसे) सांगत आहे. बुद्धीने प्रुफ (पुरावे) द्यायलाही तयार आहे. या बुद्धीवान जगाला, हा जो बुद्धीचा प्रसार झालेला आहे त्यांना प्रुफ हवा असेल तर मी प्रफ देऊ इच्छितो.
शीलवानाचे दोन गुण
या काळात हंड्रेड परसेन्ट (शंभर टक्के) शीलवान कोणीच नसतो.