________________
सवयच करुन घ्यावी. ज्ञानींच्या कृपनेच काम होते, यात धावपळ करायची नसते. कृपा केव्हा प्राप्त होते? ज्ञानींच्या आज्ञेत राहिल्याने. आज्ञेत राहिल्याने आत समाधी राहते.
आत्मा सुद्धा वीतराग आहे आणि प्रकृती सुद्धा वीतराग आहे. पण प्रकृतीचे दोष काढले की त्याची रिअॅक्शन येते. कुणाचाही दोष दिसतो तो आपलाच दोष आहे.
दादाजींचा हा सत्संग, इथे मार पडत असेल तरीही हा सत्संग सोडू नये. सत्संगात मरण पत्कारवे पण बाहेर कुठेही जाण्यासारखे नाही, सत्संगात कुणाचे दोष पाहू नयेत. नाहीतर 'वज्रलेपो भविष्यती!' म्हणून इथे लगेचच प्रतिक्रमण करुन धुऊन टाकावे नाहीतर निकाचित कर्म बांधले जाते! ज्ञानी पुरुषांचे दोष कधीही पाहू नयेत. ज्ञानी पुरुषांसमोर बुद्धी वापरली तर तो खाली घसरतो, नरकात जातो. एखादा विरळाच ज्ञानीजवळ राहून त्यांचा एकही दोष पाहत नाही! तोच ज्ञानींच्या सेवेत जवळ राहू शकतो!
__ दुसऱ्यांचे दोष पाहिल्यामुळे स्वतःचे दोष पाहण्याची शक्ती कोंडली गेली आहे. कोणाचीही चूक नसते, चूक मानायचीच असेल तर 'व्यवस्थित शक्ती' ची माना आणि 'व्यवस्थित शक्ती' म्हणजे स्वतःचाच हिशोब स्वत:च्या वाट्याला येतो. स्वतः ज्या चुका केल्या आहेत त्यांचा दंड नैसर्गिक निमित्तांद्वारे स्वतःस मिळतो.
ज्ञानींची प्रत्येक कर्म दिव्य कर्म असतात. बाह्य कर्म तर सामान्य लोकांसारखेच असतात परंतु त्यावेळी त्यांची वीतरागता न्याहाळण्यासारखी असते! प्रत्यक्षची (ज्ञानींची) वीतरागता पाहिल्याने आपण वीतराग बनतो!
मोक्षार्थीची लक्षणे कोणती? सरळ ! ओपन टु स्काय! ते स्वत:चे सारे दोष उघड करुन टाकतात!
दोषात एकाग्रता झाल्याने दोष दिसत नाही. तन्मयाकार झालो