________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
त्यावर तो म्हणेल, 'पत्त्यांची हरकत नाही.' तर तेव्हा असे म्हणू नये. त्या ऐवजी असे सांगावे की, 'भाऊ, पत्ते खेळतो, ही माझी निर्बळता आहे.
प्रश्नकर्ता : हजार लोकांसमोर चूक कबूल करावी का?
दादाश्री: हो, कबूल केली पाहिजे, म्हणजे मग पत्ते आपल्या डोक्यावर चढून बसणार नाहीत. आणि तुम्ही जर असे म्हटले की त्यात काही हरकत नाही, तेव्हा पत्ते समजून जातील की, हा मुर्ख माणूस आहे, आपण इथेच मुक्काम ठोकला पाहिजे. पत्ते समजून जातात की हे पोकळ घर आहे. म्हणूनच आपण चूक कबूल करावी, नेहमीच! अब्रू जाईल तिथेही, फक्त अब्रूच नाही पण नाक जरी कापले जात असेल ना, तरीही ते कबूल करुन घ्यावी. कबूल करण्यात मात्र पक्के असले पाहिजे.
मन वश करायचे असेल तर ते चूक कबूल केल्याने होते, स्वीकार करा ना, प्रत्येक बाबतीत स्वतःचा कमकुवतपणा उघड केल्याने मन वश होते. अन्यथा मन वश होत नाही. मग मन निरंकुश होऊन जाते. मन म्हणेल, 'आपल्याला हवे तसेच घर आहे हे!'
आलोचना ज्ञानींजवळ तुम्ही तुमचा दोष आम्हाला सांगितल्याबरोबर लगेचच सुटून जातो. तशी आम्हाला काही त्याची गरज नाही पण तुमच्यासाठी सुटण्याचा हा एक उपाय (मार्ग) आहे, कारण वीतरागांशिवाय कोणालाही स्वत:चे दोष सांगण्यासारखे नाही. कारण संपूर्ण जग दोषितच आहे. आम्हाला त्यात काही विशेषही वाटत नाही की हा दोष जड आहे आणि हा दोष हलका आहे. असे आमच्याजवळ बोललात नाही तरीही आम्हाला एकसारखेच वाटते. चूक तर माणसाकडून घडते, त्यात काय घाबरायचे? चूक मिटवणारे आहेत तिथे सांगावे की माझ्याकडून अशी चूक होत आहे. तर ते मार्ग दाखवतात.
तसतशी विकसित होते सूझ ! चूक संपवेल तर काम होईल. चूक कशी संपेल? तेव्हा म्हणे आत