________________
१२४
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
माझ्या ज्या सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम चुका आहेत की ज्या 'केवळज्ञानाला' अडवत असतील, केवलज्ञानाला बाधक अशा ज्या चुका घडत असतील त्या चुका भगवंत 'मला' दाखवतात म्हणून 'मी' जाणतो ना की हे माझे वरिष्ठ आहेत. असे नाही का लक्षात येत? आपली चूक दाखवतात ते भगवंत आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत की नाही?
प्रश्नकर्ता : हो बरोबर आहे.
दादाश्री : म्हणून आम्ही सांगत असतो ना की, जे आम्हाला चुका दाखवतात ते 'चौदालोकचे' नाथ आहेत. चौदा लोकच्या नाथांचे दर्शन करा. चूक दाखवणारे कोण आहेत? चौदालोकचे नाथ!
आणि ते दादा भगवान तर मी पाहिले आहेत, आत संपूर्ण दशेत आहेत. याची मी गॅरंटी देतो. मीच त्यांना भजतो ना! आणि तुम्हाला ही सांगतो की 'भाऊ, तुम्ही सुद्धा दर्शन करा.' दादा भगवानांची ३६० डिग्री आहे आणि माझी ३५६ डिग्री आहे, म्हणून आम्ही दोघे वेगळे आहोत, हे सिद्ध झाले की नाही?
प्रश्नकर्ता : हो ना!
दादाश्री : आम्ही दोघे वेगळेच आहोत. जे आत प्रकट झाले आहेत, ते दादा भगवान आहेत. ते संपूर्ण प्रकट झाले आहेत. परम ज्योति स्वरुप!