________________
जग निर्दोष
भगवंताने पाहिले जग निर्दोष प्रश्नकर्ता : महावीर भगवंतांनी पूर्ण जगाला निर्दोष पाहिले.
दादाश्री : भगवंतांनी निर्दोष पाहिले आणि स्वतःच्या निर्दोष दृष्टीने निर्दोष पाहिले. त्यांना कोणीच दोषी वाटला नाही. तसेच मी सुद्धा निर्दोष पाहिले आहे, मला सुद्धा कोणी दोषी दिसत नाही. फुलांचा हार घातला तरी कोणी दोषी नाही आणि शिव्या दिल्या तरीही कोणी दोषी नाही. हे तर मायावी दृष्टीमुळे सगळे दोषी दिसतात. म्हणजे हा फक्त दृष्टीचाच दोष आहे.
प्रश्नकर्ता : निर्दोषता केव्हा प्राप्त होते?
दादाश्री : जेव्हा संपूर्ण जगाला निर्दोष पाहाल तेव्हा! मी संपूर्ण जगाला निर्दोष पाहिले आहे, तेव्हा मी निर्दोष झालो. हित करणाऱ्याला आणि अहित करणाऱ्याला सुद्धा आम्ही निर्दोष पाहतो.
कोणीही दोषी नाही. त्याने जरी दोष केला असेल, तरी खरोखर त्याच्या पूर्व जन्मात केला असेल. परंतु त्यानंतर तर त्याची इच्छा नसेल तरीही आत्ता तो दोष होतो. तेव्हा तो त्याच्या इच्छे विरुद्ध होतो ना? भरलेला माल आहे, त्यात त्याचा काही दोष नाही ना, म्हणून त्याला निर्दोष मानला.
कोणत्या दृष्टीने जग दिसते निर्दोष पुद्गलला पाहू नका. पुद्गलवर दृष्टी करु नका. आत्म्याकडेच दृष्टी करा. कानात खिळा ठोकणारा सुद्धा महावीर भगवंतांना निर्दोष दिसला. दोषी दिसतो, तीच आपली चूक आहे. तो एक प्रकारचा आपला