________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
विचार आला नाही. आम्ही कुणाला मारत असलो ना, तरीसुद्धा नकारात्मक विचार नाही. उलट नीरुबेनला हेच वाटते की दादाजींनी त्याचे काहीतरी हित पाहिले असेल म्हणून मारत असतील!
प्रश्नकर्ता : आणि खरोखर तसेच असते. दादाश्री : पण आता तिथपर्यंत त्यांची बुद्धी कशी पोहोचू शकेल?
प्रश्नकर्ता : इथे तर फक्त करुणा आणि कल्याणाशिवाय दुसरे काहीच नाही.
दादाश्री : हळूहळू त्याचेही सर्व व्यवस्थित होईल.
प्रश्नकर्ता : या ज्ञानात तर जगात सुद्धा कुणाला दोषी पाहायचे नसते मग ज्ञानी पुरुषांचे दोष पाहूच कसे शकतो? जगाला निर्दोष पाहायचे आहे. स्वत:च्या चुकांमुळेच दोष दिसतात.
दादाश्री : हो, पण मनुष्याला असे भानच नाही ना! भान असेल तर असे करणारच नाही ना? जोखीम पत्करणारच नाही ना? खूपच मोठे जोखीम म्हटले जाईल! म्हणून तर त्या भाऊंना सांगितले की, आठ वाजायच्या आधी तुम्ही इथे यायचे नाही. आम्ही चहा पित असू, मग दीड कप पित असू की दोन कप पित असू! तेव्हा त्याची बुद्धी दाखवेल की, एवढे दोन कप पिण्याची काय गरज? एक कप प्यायले असते तर काय चुकीचे होते?
प्रश्नकर्ता : पाहण्यासारखे तर आतील सर्व आहे की चहा पित असताना आपण कशा प्रकारे वीतरागतेमध्ये राहता!
दादाश्री : असे पाहण्याची शक्ती कुठून आणतील? हे तर आपल्या ज्ञानाने आत गारवा (शांती) वाटतो. तेवढेच चांगले आहे ना!
प्रश्नकर्ता : दादाजी आपण तर सांगता ना की, एक क्षण सुद्धा आम्ही आमच्या मोक्षाचा ध्येय कधी विसरत नाही.