________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
६१
जर कोणी शिवी दिली आणि त्या गोष्टीचा स्वत:वर काही परिणाम होत नसेल, स्वतःचीच चूक आहे असे स्वतःला वाटत असेल आणि समोरची व्यक्ती निर्दोष आहे असे समजून स्वतः प्रतिक्रमण करत असेल, तर ते भगवंताचे सर्वात मोठे ज्ञान आहे. हेच ज्ञान मोक्षाला घेऊन जाते. एवढाच शब्द, आमच्या एकाच वाक्याचे जरी पालन केले ना, तरीही तो मोक्षाला जाईल.
दोष पाहते, तिथे बुद्धी स्थिर प्रश्नकर्ता : अर्थात दोष दुसऱ्यांचा नाही, आपलाच दोष आहे?
दादाश्री : हो, असे आहे की, बुद्धीला एका ठिकाणी स्थिर केल्याशिवाय काम बनत नाही. म्हणून समोरच्याचा दोष पाहिला तरी बुद्धी स्थिर होईल. आणि जर समोरील व्यक्तीला निर्दोष पाहिले आणि स्वत:चा दोष पाहिला तरीही बुद्धी स्थिर होईल. कारण बुद्धी आपोआप स्थिर होत नसते ना!
प्रश्नकर्ता : याचा अर्थ कुठे तरी दोष नक्कीच आहे. तिथे दोष नाही म्हणून इथे दोष आहे.
दादाश्री : हो, इतकाच फरक आहे. प्रश्नकर्ता : आता लक्षात आले की हे निर्दोष कशा प्रकारे आहे!
दादाश्री : कारण बुद्धी काय म्हणते? बुद्धी समाधान शोधत असते, स्थिरता शोधत असते. म्हणून तुम्ही एखाद्याचा दोष शोधून काढला तर बुद्धी स्थिर होते. मग त्यामुळे येणारी जबाबदारी काहीही असो, पण कोणाचा तरी दोष शोधून काढला की बुद्धी स्थिर होते. आणि दोष इतर कोणाचाही नाही पण माझाच आहे, तरीही बुद्धी स्थिर होते. पण अशाप्रकारे बुद्धी स्थिर होण्याचा मार्ग म्हणजे मोक्षमार्ग.
आता बुद्धी अशीही स्थिर होते आणि तशीही स्थिर होते पण जी