________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
काढतेवेळीही त्यास काढावे लागत नाही. जी वस्तू घातली असेल ती काढावी लागते. हे तर मला सांगतात, माझ्यातले दोष काढून टाका. अरे, पण दोष शिरला कशा? तेव्हा म्हणे, एक मनुष्य कुसंगात पडला तिथे त्याला खात्री पटली की हे लोक तर मजा करतात म्हणजे हा मार्ग खूप चांगला आहे, खूप छान, सुख देणारा आहे. त्याला त्या ज्ञानावर श्रद्धा बसली, प्रतीती बसली.
अशाप्रकारे मी यांना काय करतो? त्यांच्या ज्या चुका आहेत त्यांना ते नाकारतात की आमच्यात अजिबात चूक नाही. लोकांमध्ये चुका आहेत म्हणून त्यांच्या चुका त्यांना दाखवतो. नंतर त्यांना प्रतीती बसते, हंड्रेड परसेन्ट (शंभर टक्के) की या सगळ्या चुकाच आहेत आणि याचा आम्ही स्वीकार करतो, तेव्हा आता तुम्ही आमच्या या चुका काढा! असे म्हणतात. मी म्हटले, आता काढावे लागणार नाही. प्रतीती बसली म्हणून आता चुका निघू लागतील. तुला फक्त मोकळे मन ठेवायचे की, 'बाबा तुम्ही निघा आता.' बस, एवढेच बोलण्याची गरज. प्रतीती बसल्यानेच चूक निघून जाते आणि प्रतीती बसल्यानेच चूक आत शिरते. यात घालायचे-काढायचे नसते. हा काय कारखाना आहे? एक जरी चूक मिटवायची असेल तरीही बराच वेळ लागतो? कितीतरी जन्म निघून जातात. समजेल अशी गोष्ट आहे ना ही? प्रतीतीमध्ये डाग नाही पडला पाहिजे.
प्रश्नकर्ता : दादाजी, तुम्ही लक्षणे बघत नाहीत पण सरळ मूळ कारणावर उपचार करता, असे डॉक्टर कुठे भेटतील?
दादाश्री : डॉक्टर भेटत नाहीत त्यामुळेच तर ही समस्या आहे ना! असे डॉक्टर भेटले नाहीत आणि असे औषधही भेटले नाही, त्याचीच तर ही भानगड! म्हणून मग परिणामालाच मारत राहिले, इफेक्टलाच!
श्रद्धेमुळे शिरला. प्रतीती संपूर्ण बसली, म्हणून दोष शिरला आणि प्रतीतीनेच निघेल. संपूर्ण प्रतीती झाली पाहिजे की हा दोषच आहे. मग तो दोष निघेल. हाच नियम आहे. नंतर त्याची बाजू घेतली नाही, प्रोटेक्शन