________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
जिथे सुटला मालकीपणा सर्वस्व प्रकारे स्वतःचे जितके दोष दिसतात, तितके दोष आतून कमी होतात, असे कमी होत-होत जेव्हा दोषांचे पोते पूर्ण रिकामे होते, तेव्हा तुम्ही निर्दोष बनता. तेव्हा तुम्ही स्वत:च्या स्वरुपात आलात असे म्हटले जाईल.
आता याचा अंत केव्हा येईल? अनंत जन्मांपासून भटकतच आहोत, दोष तर वाढतच जात आहेत. म्हणजे ज्ञानी पुरुषांच्या कृपेनेच सर्व काम होऊन जाते. कारण ज्ञानी स्वतः मोक्षदाता आहेत. मोक्षाचे दान देण्यासाठी आले आहेत. त्यांना काहीच नको असते.
__ संपूर्ण जागृती असते तेव्हा स्वत:ची एकही चूक होत नाही. एक पण चूक होते ती अजागृती आहे. दोष संपवल्याशिवाय निर्दोष होऊशकत नाही आणि निर्दोष झाल्याशिवाय मुक्ती नाही.
जेव्हा संपूर्ण दोषरहित व्हाल तेव्हा निर्दोष व्हाल. किंवा थोडेफार दोष बाकी असतील तरीही जर हा मालकीपणा सोडून दिला तर निर्दोष व्हाल. हा देह माझा नाही, ही वाणी माझी नाही, तर तुम्ही निर्दोष होऊ शकाल. पण आत्ता तर तुम्ही त्याचे मालक आहातच ना? टाईटल (मालकी) सुद्धा आहे ना? मी तर टाईटल कधीचेच फाडून टाकले आहे! सव्वीस वर्षांपासून एक सेकंद पण ह्या देहाचा मी मालक झालो नाही, ह्या वाणीचा मालक झालो नाही, मनाचा मालक झालो नाही.