Book Title: The Flawless Vision Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 175
________________ १४८ निजदोष दर्शनना ने... निर्दोष प्रेम असते. जे वाढते-घटते ते प्रेम नाही. ती आसक्ति आहे. आमचे प्रेम वाढत-घटत (कमी-जास्त होत) नाही. आणि तेच शुध्द प्रेम, परमात्म प्रेम आहे. तेव्हा प्रकटते मुक्त हास्य प्रश्नकर्ता : आपले एक जरी अक्षर पोहोचले (समजले) तर निर्दोषता येईल. दादाश्री : आणि आमचे एक अक्षर पोहोचण्यास वेळही लागत नाही. हे जे ज्ञान दिले आहे ना, म्हणून एक अक्षर पोहोचण्यास वेळच लागत नाही. __संपूर्ण जग निर्दोष दिसेल तेव्हा मुक्त हास्य उत्पन्न होईल. ओझे नसलेले मुक्त हास्य उत्पन्न होऊच शकत नाही असा नियम आहे. एक जरी माणूस दोषी दिसत असेल, तोपर्यंत मुक्त हास्य उत्पन्न होत नाही. आणि मुक्त हास्य तर मनुष्याचे कल्याण करुन टाकते. मुक्त हास्याचे एकदाच दर्शन केले तरीही कल्याण होऊन जाते! त्यासाठी तर आता स्वतः ते स्वरुप व्हावे लागेल. तुम्ही स्वतः ते रुप झालात तर सर्व ठिक होईल. फक्त पर्सनालिटीच काम करीत नाही, तर स्वत:चे जे चारित्र्य आहे ते सुद्धा खूप मोठे काम करते. म्हणूनच तर शास्त्रकारांनी असे म्हटले आहे की, 'ज्ञानी पुरुष एका बोटावर संपूर्ण ब्रम्हांडाला उचलू शकतात.' कारण चारित्र्यबळ आहे. चारित्र्यबळ म्हणजे काय? निर्दोष दृष्टी. निर्दोष दृष्टी तुम्ही दादांकडून ऐकली आणि अजून तर ती तुमच्या प्रतीतीमध्ये आली आहे. आम्हाला ती अनुभवात असते. तुम्हाला प्रतीती नक्कीच बसली आहे पण अजून वर्तनात येण्यास वेळ लागेल ना? बाकी, मार्ग हाच आहे. मार्ग सोपा आहे आणि काही अडचण येईल असा नाही. जय सच्चिदानंद

Loading...

Page Navigation
1 ... 173 174 175 176