________________
जग निर्दोष
१४१
जीवमात्र निर्दोष आहेत. दोषदृष्टीने आपल्याला दोषी दिसते. तेव्हा अजून आपल्या पाहण्यात चूक होत आहे, इतके समजले पाहिजे. वास्तवात कोणी दोषी नाहीच. भ्रांतिमुळे दोष दिसतात.
महावीरांनी सुद्धा पाहिले स्वदोष चोराने तुमचा खिसा कापला तरीही तो तुम्हाला दोषी वाटत नाही, अशी कितीतरी कारणे घडतील तेव्हा मोक्ष होईल. आत्मज्ञान झाल्यानंतर अशी दृष्टी होणार आणि तेव्हाच मोक्ष होईल, नाही तर मोक्ष होत नाही.
पाहायला गेले तर, हे जे दोषी दिसतात, ती तुमची बुद्धी तुम्हाला फसवते. बाकी या जगात कोणी दोषी नाहीच! बुद्धीमुळे आपल्याला असे वाटते की याने आयुष्यभर काहीच पाप केले नाही तरीही त्याच्या नशीबी असे का? तेव्हा म्हणे, नाही, हे तर कितीतरी जन्मांचे पाप, म्हणजे चिकट पाप असतील ते उशीरा पिकतात. (उदयात यातात). आता जर तुम्ही एखादे चिकट कर्म बांधले तर पाच हजार वर्षानंतर ते पाप उदयास येते. कर्म विपाक होण्यास तर बराच टाईम जातो. आणि कित्येक कर्म हलके असतात, ते शंभर वर्षात पिकतात, म्हणून आपले लोक म्हणतात ना की साधा-सरळ माणूस आहे, चांगला माणूस आहे. सरळ माणसाची कर्म चिकट नसतात.
आणि कर्म विपाक झाल्याशिवाय फळ देत नाही. आंब्याच्या झाडावर एवढा मोठा आंबा पण रस निघत नाही. विपाक झाला पाहिजे. हे ज्ञान झाल्यानंतर आम्हाला सुद्धा कोणी मनुष्य, कोणी जीव दोषी दिसला नाही. जेव्हा अशी दृष्टी मिळेल तेव्हा महावीर दृष्टी झाली असे निश्चित होईल. महावीरांच्या दृष्टीत कोणी दोषी दिसत नव्हते. भगवंतांना कानात खिळे ठोकले तेव्हा त्यांना कोण दोषी दिसले होते?
प्रश्नकर्ता : स्वकर्म.
दादाश्री : स्वकर्म दिसले. देवतांनी ढेकूण टाकले, दुसरे केले, तिसरे केले, तरीही दोषी कोण दिसले? तर स्वत:चेच कर्म. स्वकर्म.