________________
जग निर्दोष
दावा मांडाल? नाव असलेल्यावर दावा मांडू शकतो, पण माकडाचे तर नावही नाही, काहीच नाही. कोणावर दावा मांडाल ? शिव्या कशा देणार ?
१३९
तसे तर मुकामार मार खात असतो पण घरात थोडे जरी वर-खाली झाले तर पूर्ण घर डोक्यावर घेतो! पण तरी भगवंताच्या भाषेत सर्व निर्दोषच आहेत. कारण तो झोपेत करतो, त्यात त्याचा काय दोष? समजा, झोपेत कोणी म्हणाला की, 'तुम्ही माझे घर जाळून टाकले, माझे पुष्कळ नुकसान केले', तर आता झोपेत बोलणाऱ्याला आपण गुन्हेगार कसे ठरवू शकतो ? नाही कोणी शत्रू आता
प्रश्नकर्ता : जग निर्दोष आहे, हे कोणत्या अर्थाने ?
दादाश्री : उघड्या अर्थाने ! जगातील लोक असे नाही का म्हणत की, 'हा माझा शत्रू आहे. माझे याच्याशी जमत नाही, माझी सासू वाईट आहे. पण मला तर सगळे निर्दोषच दिसतात.
प्रश्नकर्ता : पण तुम्ही तर सांगता की, तुम्हाला कोणीच वाईट दिसत नाही.
दादाश्री : कोणी वाईट आहेच कुठे? मग वाईट का बघायचे ? आपण समोरच्याचे सामान (आत्मा) बघायचे ! डबीचे काय काम? डबी पितळ्याची असो किंवा तांब्याची असो किंवा लोखंडाचीही असो ! शत्रू म्हणून पाहिला तर दुःख होईल ना, पण शत्रू म्हणून पाहतच नाही ना आता तर तुमची दृष्टी अशी आहे, चामड्याचे डोळे आहेत, म्हणून हा शत्रू, हा चांगला नाही, हा चांगला आहे. आता हा चांगला आहे नंतर दोन-चार वर्षांनी पुन्हा त्यालाच वाईट म्हणाल. म्हणाल की नाही ?
प्रश्नकर्ता : नक्कीच म्हणतो.
दादाश्री : आणि मला या जगात कोणीही शत्रू दिसत नाही. मला सर्व निर्दोषच दिसतात. कारण माझी दृष्टी निर्मळ झालेली आहे. या चामड्याच्या डोळ्यांनी चालणार नाही, त्यासाठी तर दिव्यचक्षू पाहिजेत.