________________
जग निर्दोष
१४५
दादाश्री : हो. आणि आत्ता सुध्दा ती रेकॉर्डच बोलत आहे. पण लोकांना तर असेच वाटते ना की आजच दादा बोलले, आत्ताच दादा बोलले, पण मी जाणतो की हे पूर्वीचे आहे. पण तरी देखील आम्हाला खेद तर होतोच ना ! असे शब्द निघायला नको. एक अक्षर सुद्धा असे निघायला नको.
प्रश्नकर्ता : पण जर तुम्ही जसे आहे तसे बोलला नाहीत तर ऐकणारे सगळे ‘गैरमार्गावर' जातील, असे होऊ शकते ना ?
दादाश्री : ऐकणारे ? पण ही तर बुद्धीचीच दखल ना ! वीतरागतेला तर कसलीच दखल नसते !
प्रश्नकर्ता : पण ऐकणारे तर बुद्धीच्या अधीनच असतात ना ?
दादाश्री : हो, पण माझ्या बुद्धीत आले की यामुळे ऐकणाऱ्याला नुकसान होईल, म्हणजे नुकसान आणि फायदा, प्रॉफिट आणि लॉस बघितले ना? प्रॉफिट आणि लॉस तर बुद्धी दाखवते की समोरच्याचे नुकसान होईल ! तरीसुद्धा आत्ता आम्ही जे संतांविषयी बोललो ते आज उपयोगाचे नाही. पण तेव्हा आम्ही असे मानत नव्हतो की, हे संपूर्ण जग निर्दोष आहे.
प्रश्नकर्ता : म्हणजे तेव्हा बुद्धीची दखल होती, असेच ना ?
दादाश्री : हो. तेव्हा बुद्धीची दखल होती. म्हणजे ही 'दखल' लवकर जात नाही ना ?
प्रश्नकर्ता : अर्थात सारे वर्तन पूर्वीच्या ज्ञानाच्या आधारावरच आहे ना ?
दादाश्री : पूर्वी जोपर्यंत बुद्धी होती तोपर्यंत हे टोचत होते. पण मग बुद्धी गेल्यानंतर टोचत नाही ना! बुद्धी तर प्रत्येकाला टोचत राहते. नेहमीच, जोपर्यंत बुद्धी आहे तोपर्यंत कम्पेर ॲन्ड कॉन्ट्रास्ट (तुलना आणि तफावत) हे चालतच राहते.
प्रश्नकर्ता : आणि सिध्दांत ठेवला आहे की हे निर्दोष आहे.