________________
जग निर्दोष
१३५
अंतिम दृष्टीने जग निर्दोष प्रश्नकर्ता : आता कोणताही मनुष्य मला नालायक दिसत नाही, आणि पूर्वी तर मला सर्वच नालायक दिसत होते.
दादाश्री : नाहीच मुळी. हा तपास केल्यानंतरच मी सांगितले की, मला संपूर्ण जग निर्दोष दिसते.
प्रश्नकर्ता : शुद्धात्मा पाहिले नाही तेव्हाच दोषी दिसते ना?
दादाश्री : दोषी केव्हा दिसते की जेव्हा आपण शुद्धात्मा पाहत नाही तेव्हा दोषी दिसते आणि दुसरे म्हणजे त्याने त्याचे 'सार' काढलेले नाही, एक्जॅक्टली जर 'सार' काढले तर तो स्वत:च म्हणेल, दोष पाहणारा स्वत:च म्हणेल की, भाऊ ही तर माझीच चूक आहे. अर्थात फक्त शुद्धात्मा पाहिल्यानेही काही पूर्ण होत नाही. ते मग पुढे-पुढे चालूच राहते. तेव्हा पद्धतशीरपणे निकाल झाला पाहिजे. म्हणजे त्याचे 'सार' काढून निकाल झाला पाहिजे की कशा प्रकारे त्याचा दोष नाही. हो त्याचा दोष नाही तरीही असे का दिसते?
महावीर भगवंतांनी सांगितले की, संपूर्ण जग निर्दोष आहे, जी काही चूक होती ती माझीच होती आणि ती सापडली. आणि मलाही माझी चूक सापडली. आणि आता मी तुम्हाला काय सांगतो? की तुमची चूक शोधा. मी दुसरे काहीच सांगत नाही. जो पतंगाचा दोरा माझ्याजवळ आहे, तसाच पतंगाचा दोरा तुमच्याजवळही आहे. तुम्ही शुद्धात्म्याचे ज्ञान प्राप्त केले म्हणून पतंगाचा दोरा तुमच्या हातात आला. पतंगाचा दोरा हातात नसेल आणि गटांगळ्या खाल्ल्या, आरडाओरडा केला, उड्या मारल्या तर त्याने काहीही निष्पन्न होत नाही. पण हातात दोरा असेल आणि तो ओढला तर त्याचे गटांगळ्या खाणे बंद होते की नाही? तो दोरा मी तुमच्या हातात दिला आहे.
म्हणून तुम्हाला निर्दोष पाहायचे. निर्दोष दृष्टीने शुद्धात्मा पाहून त्याला
५सत.