________________
जग निर्दोष
१३३
दादाश्री : तुम्हाला हे ज्ञान तर झाले पण तसा अनुभव कधी ना कधी होईल. पण आता त्या आधीच तुम्ही असे ठरवून टाकले म्हणजे मग काही अडचणच नाही ना! निर्दोष आहे असे म्हटल्यामुळे आपले मन बिघडत नाही. तुम्ही कुणाला दोषी ठरवले तर प्रथम तुमचे मन बिघडते आणि ते मग तुम्हाला दुःख देतेच. कारण खरोखर कोणी दोषी नाहीच. तुमच्या अक्कलनेच तुम्हाला दोषी दिसते आणि तीच भ्रांतीची जागा आहे. हो, तुम्ही मला नेहमी सगळ्यांबद्दल सांगत असता पण मी कोणाची तक्रार ऐकतो का?!
प्रश्नकर्ता : आता तुम्ही काय सांगितले की तुम्ही मला नेहमी सांगत असता.
दादाश्री : हो, पण तुम्ही अशा सर्व गोष्टी सांगत असता की हा असे करत होता, तो तसे करत होता, तर आता तुम्हाला समजले ना की हे सर्व चुकीचे आहे ?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : सगळा वेळ वाया गेला. सगळेच निर्दोष आहेत. असे समजले की, प्रश्न मिटला.
प्रश्नकर्ता : कोणी आमचा खिसा कापला तर लगेच आम्ही म्हणतो की, हा माझ्या कर्माचा उदय आहे, मग लगेच तो माणूस निर्दोष दिसतो.
दादाश्री : इतके जर तुमच्या ज्ञानात आले की, हा माझ्याच कर्माचा उदय आहे, म्हणून तो निर्दोष दिसतो, हे बरोबर आहे. यास अनुभवपूर्वकचे म्हटले जाईल.
प्रश्नकर्ता : ते अनुभवपूर्वकचे म्हटले जाईल? दादाश्री : हो. प्रश्नकर्ता : आपल्या कर्माचा उदय आहे असे दिसले तर?