________________
१२०
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
प्रश्नकर्ता : आणि प्रकृतीला निर्दोष पाहतो, तो कोण पाहतो?
दादाश्री : प्रकृतीला निर्दोष पाहतो तोच परमात्मा आहे, तोच शुद्धात्मा आहे. दुसऱ्या कशातच हात घालत नाही ना!
प्रश्नकर्ता : निर्दोष पाहण्यात त्याला कसा आनंद मिळतो? दादाश्री : तो आनंद, त्यास मुक्तानंद म्हटले जाते ना! प्रश्नकर्ता : म्हणजे परिणामाबद्दल काहीच बोलत नाही. दादाश्री : परिणामाला, प्रकृतीच्या परिणामाला बघतच नाही.
दोन प्रकारचे पारिणामिक ज्ञान आहेत. एक प्रकृतीचे पारिणामिक ज्ञान, आणि दुसरे आत्म्याचे पारिणामिक ज्ञान. प्रकृतीला तुम्ही निर्दोष पाहता म्हणजे तुम्ही त्या पारिणामिक ज्ञानात पास झालात. दोषी पाहता तेव्हा तुम्ही गुंता निर्माण करता.
प्रश्नकर्ता : पण ते जसे आहे तसे पाहण्यात कोणता स्वाद चाखत आहे?
दादाश्री : त्याने तर तो आनंद चाखलेलाच असतो ना, पण तो काय म्हणतो की, मला आनंदाची काही पडलेली नाही. मला तर हे जसे आहे तसे पाहण्यातच आनंद वाटतो. म्हणून आम्ही काय सांगतो की 'जसे आहे तसे' पाहा ना! ती सर्वात अंतिम गोष्ट आहे !
प्रश्नकर्ता : कोणत्या ज्ञानप्रकाशाच्या आधारे तो कुणालाही दोषी पाहत नाही?
दादाश्री : तो केवळज्ञानाच्या अंशाने दोषी पाहत नाही. प्रश्नकर्ता : ते कसे ज्ञान आहे ? दादाश्री : ते केवळज्ञान आहे.