________________
१२६
निजदोष दर्शनना ने....निर्दोष
अहंकार आहे. हे तर आपण बिन पगाराचे न्यायाधीश बनतो आणि मार खात राहतो. मोक्षाला जाताना हे लोक आपल्याला गोंधळवतात, असे जे आपण बोलतो ते तर व्यवहाराने बोलतो. इंद्रिय ज्ञानाने जसे दिसते तसेच बोलतो. पण खरोखर, वास्तविकतेत तर लोक अडवू शकतच नाही ना! कारण 'कोणताही जीव, कोणत्याही जीवात हस्तक्षेप करु शकतच नाही' असे हे जग आहे. लोक तर बिचारे, प्रकृती जशी नाचवते तसे नाचतात, म्हणजे यात कुणाचाही दोष नाहीच. संपूर्ण जग निर्दोषच आहे. मला स्वत:ला निर्दोष अनुभवात येत आहे. जेव्हा तुम्हाला निर्दोष अनुभवात येईल, तेव्हा तुम्ही या जगापासून मुक्त व्हाल. नाहीतर जोपर्यंत एक जरी जीव दोषी वाटत असेल तोपर्यंत तुमची सुटका होणार नाही.
प्रश्नकर्ता : त्यात सर्व जीव येतात? म्हणजे फक्त माणसेच नाहीत पण किडे, मुंग्या हे सर्व सुद्धा त्यात येतात का?
दादाश्री : हो, प्रत्येक जीव निर्दोष स्वभावाचे दिसले पाहिजेत.
प्रश्नकर्ता : दादा, तुम्ही प्रत्येक जीव निर्दोष आहे, असे म्हटले. आता जर नोकरीत मी कुठे चूक केली आणि माझा वरिष्ठ अमलदार मला असे म्हणेल की 'तू ही चूक केलीस,' मग तो मला रागवेल, ठपका देईल. आता जर मी निर्दोषच असेल तर मला कोणी रागवायला नको ना?
दादाश्री : कुणाचे रागावणे आपण पाहू नये. आपल्यावर रागावणारा सुद्धा निर्दोष आहे, असे आपल्या समजूतीत असले पाहिजे. म्हणजे कुणावर दोष टाकू शकत नाही. तुम्हाला जितके निर्दोष दिसतील, तितके तुम्ही (यर्थाथ) समजमध्ये आलात, असे म्हटले जाईल.
मला जग निर्दोष दिसते, तुमची दृष्टी सुद्धा अशी झाली म्हणजे हे कोडे सुटेल. मी तुम्हाला असा प्रकाश देईल आणि इतके पाप धुऊन टाकेल की, ज्यामुळे तुमचा प्रकाश टिकून राहिल. आणि त्यामुळे मग तुम्हाला निर्दोष दिसत जाईल. आणि त्याचबरोबर तुम्ही पाच आज्ञेत राहाल तर तुम्हाला जे ज्ञान दिले आहे, त्या ज्ञानाला सहजही फॅक्चर होऊ देणार नाही.