________________
जग निर्दोष
१२७
तत्त्व दृष्टीने जग निर्दोष आम्ही संपूर्ण जगाला निर्दोष पाहतो. प्रश्नकर्ता : असे संपूर्ण जगाला निर्दोष केव्हा पाहता येईल?
दादाश्री : तुम्हाला उदाहरण देऊन समजावतो, मग तुम्हाला समजेल. समजा एका गावात एक सोनार राहतोय. पाच हजार लोकांचे गाव आहे. तुमच्याजवळ जे सोने आहे ते सोने तुम्ही तिथे विकण्यासाठी गेलात. तेव्हा तो सोनार आधी ते सोने असे घासेल, घासून बघेल. आता आपले सोने जरी चांदीसारखे सफेत दिसत असेल, भेसळयुक्त सोने असेल तरी तो रागवत नाही. तो का रागवत नाही की, तुम्ही असे भेसळयुक्त सोने का आणले? कारण त्याची दृष्टी तर फक्त सोन्यावरच आहे. आणि दुसऱ्या कोणाकडे गेलात तर तो रागवेल की, की असे सोने का आणले म्हणून? म्हणजे जो खरा सोनार आहे तो रागवत नाही. अरे, तुम्ही जर सोनेच मागत आहात, तर याच्यात सोनेच पाहा ना! यात दुसरे सर्व का पाहता? एवढे भेसळयुक्त सोने का आणले? असे जर ओरडत राहिले, तर त्याचा अंत केव्हा येईल? आपण आपल्या परीने बघून पाहून घ्यायचे की, यात इतके सोने आहे आणि याचे इतके रुपये मिळतील. तुम्हाला समजले ना? या दृष्टीने मी संपूर्ण जगाला निर्दोष पाहतो. सोनार या दृष्टीनेच जरी कसेही सोने असले तरीही त्यात सोनेच पाहतो ना? दुसरे पाहूच नये ना? आणि रागवतही नाही. आपण सोनाराला सोने दाखवायला गेलो तर आपल्याला असे वाटते की, 'तो रागावला तर?' आपले सोने तर खराब झालेले आहे ! पण नाही, तो अजिबात रागावणार नाही. तो काय म्हणेल, 'मला बाकीच्या गोष्टींशी काय देणेघेणे? मग तो सोनार बिन अक्कलेचा आहे की अक्कलवाला आहे?
प्रश्नकर्ता : अक्कलवालाच म्हटला जाईल ना?
दादाश्री : मग हे उदाहरण बरोबर नाही का? प्रश्नकर्ता : बरोबर आहे, असे उदाहरण दिले की पटकन लक्षात येते.