________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
११९
मार्ग, सहजच जरी चुकीचा मार्ग असेल पण त्या मार्गाने गेलात तर मूळ स्थान गाठता येणार नाही. करोडो वर्षे फिरत राहिलो तरीही येणार नाही!
भिन्नता त्या दोघांच्या जाणण्यात प्रश्नकर्ता : प्रकृतीचे गुण-दोष जो पाहतो, तो पाहणारा कोण आहे ? दादाश्री : तीच प्रकृती आहे. प्रश्नकर्ता : प्रकृतीचा कोणता भाग पाहतो? दादाश्री : तो बुद्धीचा भाग, अहंकाराचा भाग. प्रश्नकर्ता : मग यात मूळ आत्म्याचे काय काम आहे ? दादाश्री : मूळ आत्म्याला काय? त्याला काही देणेघेणेच नाही ना! प्रश्नकर्ता : मूळ आत्म्याचे पाहणे-जाणणे कशा प्रकारचे असते? दादाश्री : ते निर्लेप असते आणि हे तर लेपीत आहे. प्रश्नकर्ता : म्हणजे चांगले-वाईट पाहतो तो लेपीत भाग आहे ? दादाश्री : हो, तो सर्व लेपीत भाग.
प्रश्नकर्ता : बुद्धीने प्रकृतीचे चांगले-वाईट पाहिले, हे जे पाहतो, जाणतो, तो स्वतः आहे ?
दादाश्री : प्रकृतीचे दोष पाहिले तर ती प्रकृतीच झाली. तिथे आत्मा नाही. आत्मा असा नाही. त्याला कुणाचाही दोष दिसत नाही.
प्रश्नकर्ता : एकमेकांच्या दोषांची गोष्ट नाही पण स्वतः स्वत:चे दोष पाहतो ती गोष्ट करत आहोत.
दादाश्री : तेव्हा प्रकृतीच असते. पण ती उच्च प्रकारची प्रकृती आहे, जी आत्मा प्राप्त करविणारी आहे.