________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर....
माझा कोणीच वरिष्ठ नाही, म्हणून मी सर्वांचा वरिष्ठ, वरिष्ठचाही वरिष्ठ! कारण आमच्यात स्थूल दोष तर नसतातच. सूक्ष्म दोष सुद्धा निघून गेले आहेत. सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष असतात, त्या दोषांचे आम्ही संपूर्ण ज्ञाता-दृष्टा राहत असतो. महावीर भगवंत सुद्धा हेच करत होते.
१२३
म्हणून 'ज्ञानी' देहधारी परमात्मा
ज्ञानी पुरुषात दिसू शकतील अशा स्थूल चूका नसतात. या दोषांची मी तुम्हाला व्याख्या देतो. स्थूल चूक म्हणजे काय ? माझ्याकडून जर एखादी चूक घडली तर जो जागृत मनुष्य असेल त्याला समजते की यांनी काही तरी चूक केली. सूक्ष्म चूक म्हणजे इथे पंचवीस हजार माणसं बसली असतील, तर मी समजून जातो की, माझा हा दोष झाला पण त्या पंचवीस हजारा पैकी जेमतेम पाच मनुष्य सूक्ष्म चूक समजू शकतील. सूक्ष्म दोष तर बुद्धीपूर्वक पण दिसू शकतात. परंतु सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष हे मात्र ज्ञानाच्या आधारेच दिसतात. सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष मनुष्यांना दिसत नाहीत. देवी-देवतांनाही अवधिज्ञानाने पाहिले तरच दिसतील. पण तरी तर ते दोष कुणाचे नुकसान करत नाहीत, असे सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष आमच्यात राहिलेले आहेत आणि ते सुद्धा या कलियुगाच्या विचित्रतेमुळे !
'ज्ञानी पुरुष' स्वतः देहधारी परमात्माच म्हटले जातात. ज्यांची एकही स्थूल चूक नाही की एकही सूक्ष्म चूक नाही.
आतील भगवंत दाखवितात दोष...
जग दोन प्रकारच्या चुका पाहू शकते, एक स्थूल आणि एक सूक्ष्म. स्थूल चुका बाहेरील पब्लिक पण पाहू शकते आणि सूक्ष्म चुका बुद्धिजीवी पाहू शकतात. या दोन चुका ज्ञानी पुरुषात नसतात. आणि सूक्ष्मतर दोष तर फक्त ज्ञानींनाच दिसतात. आणि आम्ही सूक्ष्मतममध्ये बसलेलो आहोत.