________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
१२१
त्यामुळे अंतराय... प्रश्नकर्ता : संपूर्ण आनंद केव्हा वर्ततो (अनुभवला जातो)? सारे दोष निघून गेल्यानंतरच ना?
दादाश्री : आनंद तर वर्ततच आहे पण जे दोष आहेत ते अंतराय (विघ्न) निर्माण करतात. म्हणून त्याला लाभ घेता येत नाही. आनंद तर आत्ता सुद्धा आहे. परंतु तो आनंद अनुभवता येईल अशी सेटींग करत नाही ना आपण.
संपूर्ण दोषरहित दशा दादांची स्वत:चे दोष पाहण्यात तर सुप्रीम कोर्टवाला सुद्धा पोहोचू शकत नाही, तिथपर्यंत जजमेन्ट पोहोचूच शकत नाही. तिथे तर स्वत:चा थोडासुद्धा दोष पाहू शकत नाही. आणि दोष तर ढीगभर होत असतात. आवरण जास्त आहेत म्हणून दोष दिसत नाहीत. आणि एवढासाच, फक्त एका केसाइतकाच दोष झाला ना, तरीही लगेच लक्षात येते की हा दोष झाला. म्हणजे आत असे कसे कोर्ट असेल? आणि हे जजमेन्टही कसे असेल? आणि तरीही कोणाशीच मतभेद नाही. गुन्हेगाराशीही मतभेद नाही. जरी गुन्हेगार दिसतो तरीही मतभेद नाही. कारण वास्तवात तो गुन्हेगार नाहीच. तो तर फॉरेनमध्ये (बाह्यभागात) गुन्हेगार आहे आणि आपल्याला तर होमशी (आत्म्याशी) देणेघेणे आहे म्हणून आपल्याला मतभेद असूच शकत नाही ना!
दादांचे स्थूल-सूक्ष्म दोन्ही दोष निघून गेले आहेत. आणि जे सुक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष राहिले आहेत, ते जगाला अजिबात नुकसानकारक किंवा फायद्याचे नसतात. जगाला स्पर्शत नाही असे दोष असतात. स्थूल दोष म्हणजे तुम्ही माझ्यासोबत चार महीने जरी राहिलात ना, तरी तुम्हाला माझा एकसुद्धा दोष दिसणार नाही, चोवीस तास सोबत राहिलात तरीही.