________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
सूझ नावाची शक्ती आहे. आपण जेव्हा खूप गोंधळून जातो तेव्हा सूझ पडते (सुचते) की नाही? आपण असे निवांत बसून राहतो तेव्हा आतूनच सुचते की नाही?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : ती सूझ देण्यासाठी कोण येत असेल? सूझ ही एकच अशी शक्ती आहे की, ती मोक्षाला घेऊन जाऊ शकते. जीव मात्रामध्ये सूझ नावाची शक्ती असते. गाई गोंधळतात तेव्हा थोडा वेळ उभ्या राहतात. चारही बाजूंनी निघण्याचा रस्ता सापडत नाही तेव्हा त्या थोडा वेळ उभ्या राहतात. मग आतून सूझ येते (सूचते) तेव्हा मग तिथून पुढे जातात. ही सूझ नावाची शक्ती आहे, ती कशी विकसित होते? तर जितक्या चुका संपत जातात, तितकी सूझ विकसित होत जाते. आणि चूक कबूल केली की, 'भाऊ, माझ्याकडून ही चूक घडली आहे.' तेव्हापासूनच शक्ती खूप वाढत जाते.
नव्हतीच कधी, तर जाईल कुठून? क्रोध केला, हे चुकीचे आहे असे समजते की नाही? आता ते लक्षातही आले असेल की, अरे ! हे जरा जास्तच झाले, याचा अर्थ स्वत:ची चूक लक्षात आली आहे. नंतर बाहेरुन शेठ आले आणि त्यांनी महाराजांना म्हटले की, 'महाराज, या शिष्यावर एवढा क्रोध? तेव्हा परत काही वेगळेच बोलतील, 'क्रोध करण्यासारखाच आहे, तो खूप आगाव आहे.' अरे, तुला स्वत:ला हे समजले आहे की, तुझ्याकडून ही घडली आहे आणि तरीही त्याचे रक्षण करतोस? (पक्ष घेतोस) कसला चक्रम आहेस तू? त्यावेळी तुम्ही शेठला काय सांगितले पाहिजे की, 'मला माझी चूक समजली आहे. पुन्हा कधी असे करणार नाही.' तेव्हा ती चूक संपेल..
म्हणजे शेठ येतात तेव्हा आपण चुकांचे रक्षण करतो, असे कशासाठी? शेठ समोर अब्रू वाचवण्यासाठी? अरे! हा शेठ स्वत:च बिन अब्रूचा आहे. कपड्यांमुळे लोकांची अब्रू आहे. नाहीतर लोकांची अब्रू आहेच कुठे? दिसते का कुठे?