________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
करावे, संपूर्ण जग निर्दोषच आहे परंतु निर्दोष दिसत का नाही, याचे कारण काय? तर ते आपल्या ॲटेक करण्याऱ्या स्वभावामुळेच. आपल्याला शिवी देतो तो सुद्धा निर्दोष आहे. मारतो तो सुद्धा निर्दोष आहे, आपले नुकसान करतो तोही निर्दोष आहे. कारण हा सर्व आपलाच हिशोब आहे. आपलाच हिशोब आपल्याला तो परत करत आहे. आणि तो जर आपण पुन्हा त्याला परत केला तर पुन्हा नवीन हिशोब बांधला जातो. म्हणून जे घडले त्यास आपण 'व्यवस्थित' मानले की मग झाले. असे सांगावे की 'घ्या, आत्ता हिशोब पूर्णपणे चूकता झाला.' निर्दोष पाहाल तर मोक्ष होईल. दोषी पाहिले याचा अर्थ तुम्ही आत्मा पाहिलाच नाही. समोरच्या व्यक्तीत जर तुम्ही आत्मा पाहिला तर तो दोषी नाही.
८२
पाहा समोरच्याला पण अकर्ता
तुम्ही काही सांगितले, तेव्हा त्याला दोष दिसला, तर त्यात काय फायदा होतो ?
प्रश्नकर्ता : फायदा कसला ? नुकसानच होते ना !
दादाश्री : तो कोणत्या ज्ञानाच्या आधारावर दोष पाहतो ?
प्रश्नकर्ता : यात ज्ञान कसे असणार? तो तर अज्ञानतेमुळे दोष पाहतो ना ?
दादाश्री : हो, पण त्याने ज्ञान घेतलेले असेल तरी सुद्धा दोष पाहतो तेव्हा? तो स्वतःचे ज्ञानच कच्चे करीत आहे. स्वतः कर्ता नाही आणि समोरच्याला कर्ता रुपात पाहतो, म्हणजे तो स्वतःच कर्ता झाल्यासमान आहे. समोरच्याला थोड्या अंशाने जरी कर्ता पाहिले म्हणजे तो ज्ञानात कच्चा (कमी) पडला असे आपले ज्ञान सांगते. मग प्रकृती जरी भांडत असेल तरी सुद्धा कर्ता पाहू नये. प्रकृती भांडेल सुद्धा.
प्रश्नकर्ता : कित्येक वेळा तर खूपच भांडते, मग हे काय आहे ?