________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
१०९
हस्तक्षेप करण्याचा स्कोपच राहिला नाही. म्हणून बुद्धीबाई तिथून मागे फिरते की, 'इथे आता आपले चालत नाही. तेव्हा घरी चला.' ती काय कुमारी थोडीच आहे ? विवाहीत होती म्हणून तर सासरी जाते. बुद्धीबाई आपल्या सासरी निघून जाते.
दोषित दृष्टीला पण तू 'जाण' प्रश्नकर्ता : म्हणजे दादा, दोषी पण मानू नये, निर्दोष पण मानू नये, निर्दोष जाणावे.
दादाश्री : जाणायचे सर्वच, पण दोषी जाणू नये. दोषी जाणतो ती तर आपली दृष्टी बिघडली आहे म्हणून आणि त्या दोषीसोबत 'चंदुभाऊ' जे काही करीत आहेत ते 'आपण' पाहत राहावे. 'चंदुभाऊला' 'आपण' अडवायचे नाही.
प्रश्नकर्ता : तो काय करतो हे आपण पाहत राहायचे.
दादाश्री : बस, पाहत राहा. कारण त्या दोषी बरोबर हा दोषी डोकेफोड करीत आहे. पण हा 'चंदुभाऊ' सुद्धा निर्दोष आहे आणि ती समोरची व्यक्ती सुद्धा निर्दोषच आहे. दोघे भांडतात पण दोघेही निर्दोषच आहेत.
प्रश्नकर्ता : म्हणजे चंदुभाऊ दोषी असेल तरीही त्याला दोषी मानू नये. पण त्याला दोषी जाणावे खरे?
दादाश्री : हो जाणावे. जाणले तर पाहिजेच ना? प्रश्नकर्ता : आणि सूक्ष्म दृष्टीने तो निर्दोषच आहे.
दादाश्री : सूक्ष्म दृष्टीने तो निर्दोषच आहे, पण चंदुभाऊचे जे काही करायचे असेल ते तुम्ही करा. परंतु जगाच्या संबंधामध्ये निर्दोष मानायचे असे मी सांगतोय. तुम्हाला चंदुभाऊला टोकावे लागते की, 'तुम्ही असे वागाल तर चालणार नाही.' त्याला शुद्ध फूड द्यायचे. अशुद्ध फूडने ही दशा झाली आहे तेव्हा आता शुद्ध फूड देऊन समाधान आणण्याची गरज आहे.