________________
११४
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
प्रश्नकर्ता : म्हणजे तुम्ही चूक काढून असे म्हणता की, 'आम्ही पाहत आहोत, आम्ही चूक काढत आहोत,' याचा अर्थ....
दादाश्री : कोणताही चूक काढणारा असे पाहू शकत नाही, आणि पाहणारा असेल तर तो चूक काढू शकत नाही. म्हणजे त्या पाहण्यात आणि ह्या पाहण्यात फरक आहे. तो इंद्रियगम्य पाहणारा आहे आणि हा अतिंद्रिय म्हणजे ज्ञानगम्य पाहणारा आहे. म्हणून त्या इंद्रियगम्यला 'पाहिले' असे म्हणता येणार नाही.
प्रश्नकर्ता : जर कुणाचीही चूक काढली, याचा अर्थ....
दादाश्री : कुणाचीही चूक काढणे तो तर सर्वात मोठा गुन्हा आहे. कारण हे जग निर्दोष आहे.
आणि हे ज्ञानगम्य म्हटले जाते प्रश्नकर्ता : पण दादा, आम्ही हे डिस्चार्ज रुपात पाहत असतो की, हे पाहा, चंदुभाऊ कुणाची चूक काढत आहे, ते पाहत असतो, मग हे काय आहे?
दादाश्री : चूक काढताना चंदुभाऊ जे पाहतात ते बुद्धीगम्य आहे. प्रश्नकर्ता : म्हणजे हा चंदुभाऊ चंदुभाऊला पाहतो ते बुद्धीगम्यच आहे?
दादाश्री : हो, ते बुद्धीगम्य आहे. आणि ज्ञानगम्य केव्हा म्हटले जाईल की कुणाची चूक काढत नाही आणि पाहतो तेव्हा ज्ञानगम्य म्हटले जाईल.
प्रश्नकर्ता : हो, पण दादा, दैनंदिन व्यवहारात एखाद्यावेळी सांगावे तर लागते ना, की ही गोष्ट बरोबर नाही.
दादाश्री : 'सांगावे लागते' असा काही नियम नाही. पण सांगितले जाते अशी निर्बळता साहजिकपणे असतेच माणसात. आम्ही सुद्धा, आमच्यासोबत राहणाऱ्यांना सांगत असतो 'परत अशी चूक का केली?'