________________
११२
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
प्रश्नकर्ता : साखळी चालत राहते.
दादाश्री : तरीही पूर्ण दिसत नाही. आवरणं असतात ना, त्यामुळे. पुष्कळ दोष असतात. विधी करतेवेळीही आमचे सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष होत राहतात, जे दुसऱ्यांना नुकसान करणारे नसतात, पण ते दोष आमच्याकडून होतात हे आमच्या लक्षात येते. आम्हाला ते त्वरित स्वच्छ करावे लागतात. त्याशिवाय तर चालणारच नाही ना ! दिसतात तेवढे तर स्वच्छ करावेच लागतात.
गहू स्वत:चेच निवडा ना
प्रश्नकर्ता : दुसऱ्यांची प्रकृती पाहण्याची सवयच नसेल तर त्यास काय म्हणतात ?
दादाश्री : दुसऱ्यांची प्रकृती पाहिली तरी त्यांचे दोष मात्र पाहायचे नाही. आपण समजून घ्यावे की 'हा दोष आहे' पण दोष पाहू नये. ते स्वत:चे दोष पाहण्यास शिकले आहेत, मग आपल्याला पाहण्याची काय गरज ?
प्रश्नकर्ता : नाही, पण ते आपले दोष बघत असतील तर आपण काय करावे ?
दादाश्री : ते आपले दोष बघतात आणि पुन्हा आपण त्यांचे दोष बघितले तर हे दिवसेंदिवस वाढत जाईल. त्यापेक्षा जर आपण बंद केले तर त्यांना कधीतरी विचार येईल की, ' हे काही थकत नाहीत. मला एकट्यालाच थकवत राहतात.' मग तेही थकून बंद होतील. दुसऱ्यांचा दोष बघणे हे वेळ वाया घालवण्यासारखे आहे. स्वतःच्या दोषांचा काही ठिकाणा नाही आणि दुसऱ्यांचे दोष बघत राहतात. अरे भाऊ! तू तुझे गहू निवड ना ! दुसऱ्यांचे गहू निवडतो आणि तुझ्या घरी न निवडताच दळत राहतोस! काय हे?
प्रश्नकर्ता : पण असे असते दादा, की आमचे गहू तर निवडलेले