________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
१११
प्रश्नकर्ता : आणि केले तर पुन्हा बंधन होईल ना?
दादाश्री : हो, करणे हेच बंधन! काही पण करणे हेच बंधन. जप केला तर 'मी केले' म्हणून बंधन. पण ते सगळ्यांसाठी नाही. बाहेरच्यांना मी सांगेल की जप करा. कारण त्यांच्याकडे तो त्यांचा व्यापार आहे. दोघांचे व्यापार वेगळे आहेत.
प्रश्नकर्ता : स्वत:ची प्रकृती दिसू लागली आहे, सर्वच दिसते, मन-बुद्धी-चित्त-अहंकार सर्व दिसते पण त्याचा स्टडी (अभ्यास) कसा करावा? त्याच्या समोर ज्ञानाचा उपयोग कसा करावा? कशी जागृती राहिली पाहिजे.
दादाश्री : प्रकृती तर आपल्याला समजतेच. आपल्याला कळते की ही प्रकृती अशीच आहे आणि कमी समजले असेल तरी दिवसेंदिवस समज वाढत जाते! पण शेवटी पूर्णपणे समजमध्ये येते. म्हणून आपल्याला फक्त काय करायचे आहे की, हे चंदुभाऊ काय करीत आहेत ते पाहात राहण्याची गरज आहे, तोच शुद्ध उपयोग आहे.
प्रश्नकर्ता : स्वत:च्या प्रकृतीला पाहायचे असते, ते पाहिले जात नाही आणि पुन्हा चुकत जातो तर यात कोणती वस्तू काम करते?
दादाश्री : आवरण. ते आवरण तर तोडावे लागते. प्रश्नकर्ता : ते कशा प्रकारे तुटते?
दादाश्री : आपल्या येथील विधींमुळे दिवसेंदिवस आवरणं तुटत जातात, तसतसे दिसू लागते. हे सारे आवरणमयच होते, काहीच दिसत नव्हते, ते हळूहळू दिसू लागले आहे. ती आवरणे सर्व दोष पाहू देत नाहीत. आताच सर्व दोष दिसतील असे नाही. किती दिसतात? दहा-पंधरा दिसतात का?
प्रश्नकर्ता : बरेच दोष दिसतात. दादाश्री : शंभर-शंभर?