________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
जा की आता आपली डिग्री वाढली ! या जगात कोणाही स्वतःचे पाप पाहू शकत नाही. स्वतःचे दोष पाहू शकत नाही. (स्वतःचे) दोष पाहिले तर भगवंत होतो.
१०८
प्रश्नकर्ता : बायकोचे किंवा कुणाचेही दोष दिसणार नाहीत असे काही करा, दादा.
दादाश्री : नाही, दोष तर दिसणारच. ते दिसतात म्हणून तर आत्मा ज्ञाता आहे आणि दोष ज्ञेय आहेत.
प्रश्नकर्ता : पण दोष दिसणारच नाहीत असे होऊ शकत नाही ? दादाश्री : नाही, दोष नाही दिसले तर आत्मा निघून जाईल. आत्मा आहे म्हणूनच दोष दिसतात, पण ते दोष नाहीत, ज्ञेय आहेत.
वीतरागांची निर्दोष दृष्टी
वीतरागांची कशी दृष्टी! कोणत्या दृष्टीने त्यांनी पाहिले की ज्यामुळे त्यांना जग निर्दोष दिसले ? अहो साहेब ! आपण वीतरागांना विचारले की साहेब, तुम्ही तर कसे, कोणत्या डोळ्याने पाहिले की ज्यामुळे हे जग तुम्हाला निर्दोष दिसले ? तेव्हा ते म्हणतात की, 'ते ज्ञानींना विचारा. आम्ही तुम्हाला उत्तर देण्यासाठी येणार नाही.' डिटेलमध्ये सविस्तरपणे ज्ञानींना विचारा. म्हणजे मी जे पाहिले ते त्यांनी तर पाहिले पण मी सुद्धा पाहिले !
प्रश्नकर्ता : म्हणजे दादा, निर्दोष जाणावे, निर्दोष मानू नये असे ? आणि दोषी जाणावे असे ?
दादाश्री : आपल्या ज्ञानात दोषी नाही, निर्दोषच जाणावे. दोषी कोणीच नसतो. भ्रांत दृष्टीने दोषी आहे. भ्रांत दृष्टी दोन भाग पाडते. हा दोषी आहे आणि हा निर्दोष आहे. हा पापी आहे आणि हा पुण्यवान आहे. आणि या दृष्टीने एकच आहे की निर्दोषच आहे. आणि तिथे मग टाळाच लावून टाकला. बुद्धीला बोलण्याचा स्कोपच (संधी) राहिला नाही. बुद्धीला