________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
प्रश्नकर्ता : पण दादाजी यात तर लगेच लक्षात आले होते की असे काहीतरी होईल. ह्या भाऊने सांगितल्यावर पटकन लक्षात आले की काही तरी गडबड केली.
दादाश्री : नाही, पण स्वत:हून काही समजत नाही. प्रश्नकर्ता : मला हे स्वत:हून समजले होते.
दादाश्री : त्याने सांगितले, त्याने सावध केले म्हणून मागे (वळून) पाहिले. बाकी ‘स्वतःहून' तर काही होतच नाही.
प्रश्नकर्ता : ह्या भाऊने सांगितले आणि लगेच मला स्ट्राईक झाले की, माझ्याकडून ही चूक झाली.
दादाश्री : चूक झाली हे लक्षात येते ना? चूक झाली असे लक्षात आले तेव्हाच सुधारतो ना? लक्षात आले की मग लगेच सुधारतो ना?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : मग बरोबर आहे. चूक तर बाहेर होतच राहणार. ते तुझ्या लक्षात येईल, समजत जाईल. जेव्हा स्वतःची चूक स्वतःहून लक्षात येते तेव्हा मी म्हणेल की हा आहे ज्ञानी! मनुष्य चुका करतच जीवन जगत असतो. चुकांनाच सत्य मानून जीवन जगत असतो. नंतर जेव्हा स्वत:ला काही भोगावे लागते तेव्हा विचार करतो की, हे असे का बरे होते? त्यानंतर लक्षात येते. परंतु जेव्हा भोगल्याशिवायच चूक लक्षात येते तेव्हा समजावे की आता ज्ञान प्रगट झाले आहे ! हे ज्ञान आहे आणि हे अज्ञान आहे असा भेद पडला पाहिजे.
प्रश्नकर्ता : स्वत:ची चूक लक्षात आल्यानंतर चूक होणे थांबते का?
दादाश्री : थांबत नाही त्यास हरकत नाही. लक्षात आले म्हणजे पुष्कळ झाले. चूक होणे थांबेल किंवा थांबणारही नाही तरीही माफच आहे. चूक लक्षात येत नाही त्याला मात्र माफी नाही. चूक होणे थांबत