________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
कोणत्याही जीवाचा मुळीच दोष नाही. असे दिसले तर ते ज्ञान म्हटले जाईल पण तसे दिसत नाही ना?
प्रश्नकर्ता : दोषी पाहायचे नसते तरीही दोषी दिसते त्यास डिस्चार्ज म्हटले जाते ना?
दादाश्री : डिस्चार्ज. डिस्चार्ज टु बी हॅबिच्युएटेड. ज्यात स्वत:ची सत्ता नाही त्यास हॅबिच्युएटेड म्हटले जाते.
प्रश्नकर्ता : दोषी दिसले तर ते डिस्चार्ज कसे म्हटले जाईल?
दादाश्री : दोषी पाहाण्याचा भाव सुटला म्हणून डिस्चार्जच म्हटले जाईल ना! पण त्याने पूर्णपणे आज्ञा पाळली नाही. तो हळूहळू आज्ञा पाळत जाईल, तसतसे शुद्ध होत जाईल. तोपर्यंत त्याचे प्रतिक्रमण करावे लागेल.
प्रश्नकर्ता : पण बेसिकली असे फिट झाले आहे की, निर्दोषच आहे पण कधीतरी असे दोषी बघितले जाते.
दादाश्री : म्हणूनच ते 'हॅबिच्युएटेड' आहे, असे म्हटले ना. नसेल करायचे तरीही होऊन जाते.
प्रश्नकर्ता : आमची दृष्टी अजून निर्दोष का होत नाही? दादाश्री : दृष्टी निर्दोषच आहे.
प्रश्नकर्ता : निर्दोषच दिसले पाहिजे, हाच आमचा भाव आहे, पण तरी सुद्धा दुसऱ्यांचे दोष दिसतात.
दादाश्री : दोष दिसतात, तर ज्याला दिसतात त्याला आपण 'पाहत' असतो, बस. आत जसा माल भरला असेल तसाच निघेल ना?
प्रश्नकर्ता : पण त्याचे प्रतिक्रमण करावे लागेल ना? दादाश्री : प्रतिक्रमण तर करावेच लागेल! असा माल का भरला?