________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
श्रद्धेने सुरु, वर्तनाने पूर्ण... अर्थात हे आपले ज्ञान शुद्ध ज्ञान आहे. समज सुद्धा शुद्ध आहे. संपूण जग निर्दोष दिसले पाहिजे. प्रथम श्रद्धेत निर्दोष आले, आता हळूहळू समजमध्ये येईल, ज्ञानात येईल. स्वतः शुद्धात्माच आहे ना! खिसा कापला तरी निर्दोष दिसले पाहिजे.
जे जाणले ते मग पूर्णपणे आपल्या श्रद्धेत येते, त्यानंतर वर्तनात येते. म्हणजे अजून पूर्णपणे श्रद्धेत आलेले नाही. जसजसे श्रद्धेत येत जाईल तसतसे वर्तनात येत जाईल. तो प्रयोग हळूहळू होतो. असे एकदम नाही होऊ शकत! पण ते जाणल्यानंतरच प्रयोगात येईल ना?!
प्रश्नकर्ता : पण हे तर बऱ्याच काळापासून जाणलेच आहे ना?
दादाश्री : नाही. यास जाणले असे नाही म्हटले जात. जाणले तर त्यास म्हणतात की जे वर्तनात येतेच. अर्थात पूर्णपणे जाणलेले नाही. हे तर स्थूल जाणले. जाणण्याचे फळ काय? तर ते लगेचच वर्तनात येते. म्हणजे हे स्थूल जाणले आहे, अजून तर याचे सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम होईल तेव्हा वर्तनात येईल.
सोडू नका कधी 'हा' सत्संग ह्या सत्संगात मार खावा लागला तर मार खाऊन सुद्धा हा सत्संग सोडू नका. मरावे लागले तरी अशा सत्संगात मरावे पण बाहेर मरु नये. कारण ज्या हेतूसाठी मेला, तो हेतू त्याला जॉईंट होत असतो. इथे कोणी मारत नाही ना?
आणि मारले तर निघून जायचे का? हे जग नियमबद्ध चालत आहे. आता यात कुणाचा दोष पाहिला तर काय होईल? खरोखर कुणाचा दोष असेल का?
प्रश्नकर्ता : कुणाचा दोष तर नसेल पण मला असे दिसते.
दादाश्री : असे जे दिसते, ते दर्शन चुकीचे असते. समजा आपण एक वस्तू इथून पाहिली, तो घोडा असेल पण आपल्याला बैलासारखा