________________
१०४
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दादा 'डॉक्टर' दोषांचे चुका पुष्कळच आहेत, असे जर जाणले तर चुका दिसू लागतात आणि दिसल्यावर चूका कमी होऊ लागतात. आम्ही काही सगळ्यांचे दोष पाहत बसत नाही. आमच्याजवळ असा रिकामा वेळही नसतो. ते तर तुमचे खूप पुण्य जमा होते तेव्हा तुमचे दोष दाखवतो. या दोषांमुळे
आत मोठा रोग उत्पन्न होतो. जेव्हा तुमचे पुण्य उदयास येते तेव्हा आम्ही सिद्धीबळाचा वापर करुन त्या व्यक्तीचे ऑपरेशन करुन त्या रोगाला बाहेर काढतो. डॉक्टर ऑपरेशन करतात, त्याहीपेक्षा लाख पटीने जास्त मेहनत आमच्या ऑपरेशनमध्ये असते!
दोष मिटवण्याचे कॉलेज हसत-खेळत दोष मिटवण्याचे हे कॉलेजच आहे! नाही तर रागद्वेषाशिवाय दोष जातच नाहीत. हे कॉलेज हसत-खेळत चालत आहे. हे सुद्धा एक आश्चर्यच आहे ना! अक्रम विज्ञानाचे हे आश्चर्यच आहे ना!
प्रश्नकर्ता : आपले शब्द असे निघतात की, ज्यामुळे ते दोष तिथून निघू लागतात. इथून शब्द असे निघतात की ते दोष तिथे गळून पडतात.
दादाश्री : गळून पडतात ना? बरोबर आहे.
आता तुम्हाला तुमचा दोष दिसत आहे हे कसे समजेल? तर म्हणे, चंदुभाऊ रागावतो ते तुम्हाला आवडत नाही. म्हणजे हे तुम्ही जाणले की, चंदुभाऊमध्ये हा दोष आहे. पकडला गेला तो दोष. तो दोष तुम्ही पाहिला. चंदुभाऊत जे दोष होते ते तुम्ही पाहिलेत. 'दिठा नही निजदोष तो तरीए कोण उपाय?' (अर्थात पाहिले नाही स्वतःचे दोष तर कोणत्या उपायाने तरणार?) निजदोष पाहण्याची दृष्टी उत्पन्न झाली म्हणजे परमात्मा होण्याची तयारी झाली असे म्हटले आहे आणि निजदोष कुणालाही दिसत नाहीत. अहंकार आहे तोपर्यंत प्रत्येक अणूत दोष आहे. भ्रांती जाते तेव्हा समजते की, अहोहो! चंदुभाऊ क्रोध करतो ते आपल्याला