________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
गरुड येताच, साप पळतात शास्त्रकारांनी एक उदाहरण दिले आहे की भाऊ, या चंदनाच्या जंगलात केवळ साप आणि सापच असतात. गारव्यासाठी ते चंदनाच्या झाडांना गुंडाळून बसलेले असतात. जंगलात चंदनाच्या झाडांना गुंडाळून बसतात पण एक गरुड आला की नुसती पळापळ होते. तसेच मी हे गरुड बसवले आहे, तेव्हा आता हे सर्व दोष पळतील. शुद्धात्मारुपी गरुड बसले आहे म्हणून सर्व दोष पळून जातील. आणि 'दादा भगवान' शिरी आहेत मग त्याला कसली भिती! माझ्या शिरी 'दादा भगवान' आहेत म्हणून तर 'मला' एवढी हिंमत आहे, मग काय तुम्हाला हिंमत येणार नाही? प्रश्नकर्ता : हिंमत तर पुरेपूर येते !
निष्पक्षपाती दृष्टी दादाश्री : 'स्वरुपज्ञाना' शिवाय तर चुका दिसत नाहीत. कारण 'मीच चंदुभाऊ आहे आणि माझ्यात काहीच दोष नाही, मी तर खूप शहाणा-समंजस आहे,' असेच वाटत राहते आणि 'स्वरुप ज्ञान' प्राप्तीनंतर तुम्ही निष्पक्षपाती झालात, मन-वचन-कायेवर तुम्हाला पक्षपात राहिला नाही. म्हणून तुमच्या चुका तुम्हाला दिसतात. ज्याला स्वतःची चूक सापडेल, ज्याला क्षणोक्षणी स्वत:ची चूक दिसते, जिथे-जिथे चूक होते, तिथे दिसते, आणि नाही होत तिथे नाही दिसत, तो स्वत:च 'परमात्म स्वरुप' होऊन गेला! वीर भगवंत होऊन गेला!! 'हे' ज्ञान प्राप्त केल्यानंतर स्वतः निष्पक्षपाती झाला. कारण की 'मी चंदुभाऊ नाही, मी शुद्धात्मा