________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
७५
गुन्हेगारी आणि आमच्यावर दगड फेकतात ती सुद्धा गुन्हेगारी! फुले वाहतात ती पुण्याची गुन्हेगारी व दगड मारतात ती पापाची गुन्हेगारी आहे. हे कसे आहे? तर पूर्वी ज्या चुका केल्या त्याची कोर्टात केस चालते आणि नंतर न्याय होतो. ज्या ज्या चुका केल्या ते सर्व गुन्हे भोगावे लागतात, त्या चुका भोगाव्याच लागतात. त्या चुकांचा आपण समताभावे निकाल करावा, त्यात मग काहीच बोलायचे नाही. न बोलल्याने काय होईल? तर वेळ आली की ती चूक समोर येते आणि ती भोगून झाल्यावर निघून जाते. उच्च जातींमध्ये बोलल्यामुळेच तर गुंता झालेला आहे ना! म्हणून त्या गुंत्याला सोडवण्यासाठी मौन राहिलात तर समाधान होईल. ___'ज्ञानी पुरुषांनी' गुंता केलेलाच नाही, म्हणून त्यांना आता पुढच्या पुढे वैभव मिळत राहते. आणि तुम्हा सर्वांना आत्ता ह्या जन्मात 'ज्ञानी पुरुष' भेटले आहेत. तेव्हा मागील गुंत्याचा समताभावे निकाल करा आणि पुन्हा नवीन गुंता करु नका, म्हणजे तो गुंता पुन्हा येणार नाही आणि शेवटी समाधान होईल.
तेव्हा आपल्याला चूक संपवावी तर लागेल ना!
प्रश्नकर्ता : हो पण कोणकोणत्या चुका आहेत त्या दिसल्या तर पाहिजेत ना!
दादाश्री : चुका तर हळूहळू दिसू लागतील. मी तुम्हाला सांगत जाईन तसतसे तुम्हाला दिसू लागतील. तुमच्यात चूक पाहण्याची दृष्टी उत्पन्न होईल. तुमची इच्छा झाली की मला आता माझी चूक शोधून काढायची आहे, तर ती सापडल्याशिवाय राहणारच नाही.
आत्ता जो तुमचा उदय आहे ना, त्या उदयात जो दोष आहे तो रिझर्वोयर (सरोवर) चा माल आहे. त्यात नवीन माल येणार नाही आणि जुना माल निघण्याचे चालू आहे. सुरुवातीला खूप जोरात निघेल नंतर दोन-पाच वर्षांनी रिकामा होतो. नंतर हाक मारली तरीही येणार नाही आणि काही वर्षांनंतर तर त्याची काही विशेष अवस्था येईल.