________________
६८
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
प्रश्नकर्ता : मतभेद तर असूच शकत नाही, कारण निश्चयाने तर तुम्हाला कोणतीही व्यक्ती दोषी वाटतच नाही ना.
दादाश्री : दोषी वाटत नाही, कारण वास्तवात तसे नाहीच. हे जे दोषी वाटते ना ते दोषित दृष्टीमुळे वाटते! तुमची दृष्टी जर निर्दोष झाली तर तुम्हाला कोणीही दोषी वाटणार नाही!
असा अंत येतो गुंतागुंतीचा गुंतागुंतीचा अंत केव्हा येतो? रिलेटिव्ह आणि रियल या दोनच वस्तू जगात आहेत. ऑल धीस रिलेटिव्हस् आर टेम्पररी एडजस्टमेन्ट, आणि रियल इज दी परमनन्ट. आता रिलेटिव्ह भाग किती आणि रियल भाग किती यांच्यामध्ये लाईन ऑफ डिमार्केशन (भेदरेषा) आखून दिली तर गुंतागुंत बंद होते, नाही तर गुंतागुंत बंद होत नाही. चोवीसही तीर्थकारांनी ही लाईन ऑफ डिमार्केशन आखली होती. कुंदकुंदाचार्यांनी सुद्धा ही लाईन टाकली होती आणि आत्ता आम्ही सुद्धा ही डिमार्केशन लाईन आखून देतो की ज्यामुळे लगेच त्याचे सर्व ठीक होऊन जाते. रिलेटिव्ह आणि रियल या दोन्हींच्या गुंतागुंतीमध्ये लाईन ऑफ डिमार्केशन, भेदरेषा आखून देतो की हा भाग तुझा आहे आणि हा भाग परका आहे. तर आता परक्या भागाला तू माझा मानू नकोस, असे त्याला समजावले की, मग प्रश्न मिटला.
__ हा तर परका माल हडपून घेतला आहे. त्याचीच ही सर्व भांडणे चालतात, भांडणे चालूच राहतात. गुंतागुंत म्हटल्यावर भांडण चालूच राहते, पण स्वतःची एकही चूक दिसत नाही, आणि तसे पाहिले तर पूर्णपणे चुकांनी भरलेलेच आहेत! अर्थात रिलेटिव्ह आणि रियलचे ज्ञान झाल्यानंतर स्वत:च्याच चुका दिसतात. जिथे बघाल तिथे स्वत:च्याच चुका दिसतात आणि आहेच स्वत:ची चूक. स्वत:च्या चुकांमुळे हे जग टिकून राहिलेले आहे, दुसऱ्यांच्या चुकांमुळे हे जग टिकून राहिलेले नाही. स्वतःची चूक संपल्यावर तो सिद्धगतीतच निघून जातो!