________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
प्रश्नकर्ता : दोष पाहिल्याने नाही, पण डिस्टिंक्शन करायचे की हा माणूस असा आहे, तो माणूस असा आहे.
दादाश्री : नाही, यात तर जोखीम आहे. यास प्रिज्युडीश (पूर्वग्रह) म्हटले जाते. प्रिज्युडीश कोणासाठीही ठेवू नये. काल एखाद्याने कोटमधून पैसे चोरुन नेले असतील तर, तो आजही चोरी करेल असे आपण गृहीत धरू नये. फक्त आपण कोट सुरक्षित जागी ठेवला पाहिजे. दक्षता बाळगली पाहिजे. काल कोट बाहेर ठेवला होता तर आज योग्य जागी ठेवावा पण पूर्वग्रह ठेवू नये. त्यामुळेच तर हे दुःखं आहते ना सारे, नाही तर जगात दुःखं का असतील? आणि देव दुःख देत नाही हे सर्व तुम्हीच तयार केलेले दुःखं आहे आणि तेच तुम्हाला त्रास देत आहेत. त्यात देव काय करेल? कोणासाठी पूर्वग्रह ठेवू नका. कोणाचाही दोष पाहू नका, हे एवढे समजून घेतले तर समाधान होईल.
तुम्ही प्रतिक्रमण नाही केले तर तुमचा अभिप्राय राहिला, म्हणून तुम्ही बंधनात आलात. जो दोष झाला त्यात तुमचा अभिप्राय बाकी राहिला आणि अभिप्रायाने मन तयार झालेले आहे. माझा कोणत्याही व्यक्तीसाठी किंचितही अभिप्राय नाही. कारण एकदाच पाहिल्यानंतर मी त्याच्यासाठी दुसरा अभिप्राय बदलत नाही.
संयोगानुसार एखादी व्यक्ती चोरी करीत असेल आणि मी स्वतः त्याला चोरी करताना पाहिले असेल तरी देखील मी त्याला चोर म्हणणार नाही. कारण की ते संयोगाधीन आहे. जगातील लोक तर जो पकडला जातो त्याला चोर म्हणतात. तो संयोगाधीन चोर होता की कायमचा चोर होता याचा विचार लोक करीत नाही. मी तर कायमच्या चोराला चोर म्हणतो आत्तापर्यंत मी कुठल्याही व्यक्तीसाठी अभिप्राय बदलला नाही. 'व्यवहार आत्मा' संयोगाधीन आहे, आणि 'निश्चय आत्म्याशी' एकता आहे. आम्हाला संपूर्ण जगाविषयी मतभेद नाहीत.