________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
देहधारी होते ना तोपर्यंत त्यांच्यात दोन-पाच लाख चुका असायच्या आणि हा आहे बिन चुकांचा!
जर स्वत:चे दोष दिसत नसतील, तर कधीही तरण्याची (मोक्षाची) गोष्टच करु नये, अशी आशाही बाळगू नये. मनुष्य मात्र अनंत चुकांचे भाजन आहे. आणि जर त्याला स्वत:ची चूक दिसत नसेल, तर एवढेच समजावे की, त्याच्यावर भयंकर आवरण आलेले आहे. त्यामुळे त्याला चूक दिसतच नाही.
आता तरी थोड्याफार चुका दिसतात? चुका दिसतात की नाही तुला? प्रश्नकर्ता : आता दिसतात.
दादाश्री : चुकांचा स्वभाव कसा आहे की, जी चूक दिसली ती निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी परत तेवढ्याच नवीन चुका समोर येतात. निव्वळ चुकांचेच भांडार आहे ! हे तर भांडारच चुकांचे आहे. मग रागवतो आणि रागावल्यानंतर समाधानही करता येत नाही. अरे कशाला रागवतोस? तू रागावलास ना तर आता त्याचा निकाल तर लाव! जसे आपण ताट उष्टे केले असेल तर ते धुता नाही का येत? पण हा तर रागवून बसतो आणि नंतर त्याला त्याचा निकालही लावता येत नाही. मग तोंड फुगवून फिरत राहतो! अरे बाबा, तोंड कशाला फुगवतोस? ।
नुसते चुकांचेच भांडार, म्हणून तर जीव होतो ना? नाहीतर स्वतः शिव आहे, जीव-शिवचा भेद का वाटतो? तर चुकांमुळेच. या चुका संपवल्या तर, सुटका होईल.
पाहिले नाहीत निजदोष तर.... पहिले वाक्य असे सांगते की 'मी तर दोष अनंताचे भाजन आहे करुणाळ' आणि शेवटचे वाक्य सांगते की 'पाहिले नाहीत निजदोष तर, तरणार कोणत्या उपायाने!'
'अनंत दोषांचे भाजन आहे,' हे मला सुद्धा समजते. पण दिसत