________________
४८
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
टाकते. 'ज्ञानी पुरुषां' व्यतिरिक्त असे कुणीच बोलू शकत नाही की, 'एकही चूक उरली नाही.' प्रत्येक चुकीला बघून ती चूक संपवायची
आहे. सर्व जण स्वतःच्या दोषानेच बांधलेले आहेत. फक्त स्वतःचेच दोष पाहत राहिल्याने सुटता येईल असे आहे. 'आम्ही' स्वतःचेच दोष पाहत राहिलो म्हणून तर आम्ही सुटलो. निजदोष समजले की मग तो सुटत जातो. म्हणजे ज्ञानी पुरुष तुमची चूक मिटवू शकतात, दुसऱ्या कोणालाही हे जमणार नाही.
आम्ही त्वरित चूक एक्सेप्ट करुन निकाल लावून टाकतो. हे कसे आहे की, पूर्वी ज्या चुका केल्या होत्या त्यांचा निकाल लावला नाही म्हणून त्याच चुका पुन्हा पुन्हा होत आहेत. चुकांचा निकाल लावता आला नाही त्यामुळे एक चूक काढण्याऐवजी दुसऱ्या पाच चुका केल्या.
नाही त्याला वरिष्ठ कोणी प्रश्नकर्ता : पण दादा, प्रत्यक्ष पुरुषाशिवाय या चुका लक्षात येत नाहीत का?
दादाश्री : कसे लक्षात येईल?! त्यांना स्वत:चीच चूक समजत नाही तेव्हा ते दुसऱ्यांची चूक कशी मिटवतील? ज्याला वरिष्ठाची गरज नाही, ज्याला कोणी चूक दाखविणाऱ्याची गरज नाही, तोच चूक मिटवू शकतो. त्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही चूक मिटवू शकत नाही. जो स्वतः स्वतःच्या सर्व प्रकारच्या चुकांना जाणतो त्याला मग वरिष्ठाची गरजच नाही. वरिष्ठाची गरज कुठपर्यंत असते की जोपर्यंत तुम्ही स्वत:च्या चुका पाहू शकत नाही तोपर्यंत. आणि तुमच्यात ठराविक प्रकारच्या चुका असतील तर ते तुमच्या वरिष्ठ म्हणून राहतीलच आणि हा वरिष्ठपणा केव्हा सुटतो? तुमची एकही चूक, जी तुम्हाला दिसत नसेल त्या सर्वच चुका जेव्हा दिसू लागतात तेव्हा वरिष्ठपणा सुटतो. ही तर नियमशीर गोष्ट आहे ना! तुम्हा सर्वांना स्वतःच्या कमी चुका दिसतात म्हणून तर मी वरिष्ठ आहे अजून. तुमच्या चुका तुम्हाला दिसू लागल्या मग मी कशाला वरिष्ठ होऊ?