________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
बुद्धी दुसऱ्या कोणावरही आरोप करणारी नसेल अशी बुद्धीची स्थिरता असली पाहिजे. म्हणून आपण स्वत:वरच घेतले तर याचे समाधान होईल. आणि त्यामुळे मग बुद्धी पण स्थिर होईल ना!
अशाप्रकारे या जगात ढवळाढवळ होत आहे. स्वत:ची चूक सापडत नाही आणि दुसऱ्याची चूक लगेच लक्षात येते. कारण बुद्धी वापरली आहे ना! आणि ज्याने बुद्धी वापरली नाही त्याच्याकडून चूक होण्याचा तर काही प्रश्नच येत नाही, काही तक्रारच नाही ना! या गाई-म्हशी आहेत, असे सर्व अनंत जीव आहेत, त्या लोकांना काहीच तक्रार नसते, बिलकूल तक्रार नसते.
प्रश्नकर्ता : ही तर खूप महत्त्वाची गोष्ट निघाली की बुद्धीला स्थिर करायची. पूर्वी बुद्धीला संसारात स्थिर करत होतो, तेव्हा दोष दिसत होते.
दादाश्री : हो, बुद्धीला स्थिर करण्यासाठी साधन पाहिजे, तेव्हा शेवटी स्वतः गुन्हेगार नाही असे ठरवतात लोक. आपण असेच सांगतो की, 'तो तर गुन्हेगार आहेच ना!' अर्थात कोणावर तरी दोषारोपण करुन बुद्धीला आपण स्थिर करतो. म्हणून बुद्धी जर स्थिर होत नसेल तर दुसरे काय कराल? तर तेव्हा तुम्ही असे म्हटले पाहिजे की, हा माझाच दोष आहे, जेणे करुन मग बुद्धी तिथे स्थिर होते. नाही तर बुद्धी जर हालायला लागली की आत पूर्ण अंत:करण ढवळले जाते. जसे इथे हुल्लड झाला असेल ना त्याचप्रमाणे. म्हणून बुद्धीला स्थिर करावे लागते ना. स्थिर करत नाही तोपर्यंत हुल्लड झाल्यासारखे होते. अज्ञानी स्वत:च्या जबाबदारीवर बुद्धी स्थिर करतो आणि तुम्ही स्वतःचीच चूक पाहून स्थिर करता आणि स्थिर केले म्हणूनच हुल्लड बंद झाले ना! नाही तर आत विचारांची परंपरा चालूच राहते.
जर असे म्हटले की ही त्याची चूक आहे, तर मग आपली बुद्धी स्थिर होते. मग निवांतपणे जेवण गोड लागते. पण मग यातून संसार पुढे वाढत जातो. आपल्याला तर संसारातून मुक्त व्हायचे आहे. म्हणून आपण