________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
सांगावे की, 'चूक माझीच आहे,' तेव्हाच बुद्धी स्थिर होईल आणि मग जेवणही गोड लागेल. अर्थात बुद्धी स्थिर झाली पाहिजे. समजेल अशी गोष्ट आहे ना?
प्रश्नकर्ता : बुद्धी स्थिर होते, ही गोष्ट अगदी बरोबर समजेल अशी आहे.
दादाश्री : हो, आणि जोपर्यंत बुद्धी अस्थिर आहे, तोपर्यंत खाऊ देत नाही, पीऊ देत नाही, झोपूही देत नाही, काहीच करु देत नाही. म्हणजे ही मनाची चंचळता नाही पण बुद्धीची चंचळता आहे. बुद्धी स्थिर झाली म्हणजे प्रश्न मीटला.
प्रश्नकर्ता : आपण सांगितले ना की बुद्धी स्थिर होते, संसाराकडे किंवा मग आत्म्याकडे...
दादाश्री : तुम्ही समोरच्या व्यक्तीला दोष दिला तर तुमची बुद्धी स्थिर होते म्हणून तुम्हाला खाऊ देते, पिऊ दिते, झोपू देते, सर्व काही करु देते. पण समोरच्या व्यक्तीला दोषी ठरवल्याने संसार कायम राहिल. आणि मी काय सांगतो की जर संसाराचा अंत आणायचा असेल तर मूळ दोष तुमचाच आहे, वास्तवात हे असेच आहे. आता स्वतःला दोष दिला तरीही बुद्धी स्थिर होईल. बुद्धीला असे नाही की स्वतःला दोष का दिला. पण शेवटी बुद्धी स्थिर झाली पाहिजे. बुद्धीला स्थिर केल्याशिवाय चालणार नाही. हे असे काही शास्त्रात थोडीच लिहिण्यात येते?
असे आहे की, या जगाचे संपूर्ण सार शास्त्रात राहीलेला नाही. पण आम्ही हे उघड करीत आहोत की, या जगात कोणीही दोषी नाहीच. हे सर्व जे दिसते, मारामारी, रक्तपात, चोरी, लबाडी हे जे सर्व होत आहे त्यात कोणीही दोषी नाही, ही वास्तविक दृष्टी आहे. वास्तविक दृष्टी ठेवून जर तुम्ही कधी ताळमेळ बसवला तर तुमची दोष दृष्टी निघून जाईल आणि दोष दृष्टी गेली म्हणजे तुम्ही खुदा (देव) झाले, बस! दुसरे काहीच नाही.