________________
५४
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
चूकरहित ज्ञान आणि समज प्रश्नकर्ता : चूकरहित ज्ञान आणि चूकरहित समज झाली तर तू स्वत:च मोक्ष स्वरुप आहेस. खूपच उच्च कोटीची गोष्ट सांगितली. आरोपित भाव हीच मुळात चूक आहे, बंधन आहे.
दादाश्री : हो आणि जोपर्यंत हे विज्ञान प्रकट होत नाही, तोपर्यंत असे स्पष्टीकरण मिळतच नाही ना! शास्त्रात असे स्पष्टीकरण केलेले नसते! फक्त शुभ करा, काही तरी शुभ करा, असे सांगतात पण आरोपित भाव आहे असे कोणीच समजवत नाही. कारण ज्ञानी पुरुषांशिवाय असे स्पष्टीकरण मिळत नाही.
लोकांना बुद्धीपूर्वक हे समजलेले असते की काही तरी चूक घडत आहे, खूप मोठी चूक घडत आहे, असे समजते पण तरीही ज्ञानी पुरुष भेटत नाहीत तोपर्यंत ते काय करतील? आंबा असाच उकडत राहतो. लोक खूप समजदार आहेत, ते बुद्धीपूर्वक सर्व समजून सार काढतात की हे सर्व काय आहे? पण तरीही उकडत राहतात. आणि ज्ञानी पुरुष भेटले तर सर्व स्पष्टीकरण देतात. प्रत्येक शब्दाचे स्पष्टीकरण केले नाही तर ते ज्ञानी पुरुषच नाहीत. स्पष्टीकरण व्हायलाच पाहिजे. जर अज्ञानाने स्पष्टीकरण होत असेल तर अज्ञान काय कमी होते? अज्ञान नव्हते का आपल्या घरी? स्टॉक भरुन होतेच ना!
पुरेशी आहे चुकांची प्रतीती बसणे लोक म्हणतात की आता आम्ही आमच्या दोषांना ओळखले आहे पण ते दोष आता तुम्ही काढून टाका. तुम्ही आम्हाला मारा-ठोका, जे करायचे असेल ते करा पण आमच्यातले दोष काढून टाका. तर आता यासाठी कोणता उपाय?
दोष शिरला कसा हे तुम्ही शोधा, त्यानंतर समजेल की दोष कशाप्रकारे निघेल? दोष शिरतो तेव्हा त्यास घालावे लागत नाही, म्हणून