________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
३७
कारण की जिथे मोहाचेच साम्राज्य असेल, मोहाने भरलेले! मी अमका आहे, मी असा आहे, याचाही मोह! स्वत:च्या पदाचाही मोह असतो ना? नाही का?
प्रश्नकर्ता : हो, पुष्कळ असतो!
दादाश्री : तर हेच आहे. दुसरे काही नाही. निंदा करण्यासारखे नाही पण सगळीकडे असेच आहे.
तेव्हा आला महावीरांच्या मार्गात जेव्हापासून स्वत:चे दोष दिसणे सुरु होते तेव्हापासूनच कृपाळुदेवांचा धर्म समजला, असे म्हटले जाईल. स्वतःचे दोष जे आज दिसत आहेत, ते उद्या दिसणार नाहीत, उद्या परत नवीन प्रकारचे दिसतील, परवा त्याहीपेक्षा वेगळ्या प्रकारचे दिसतील, तेव्हा आपण समजावे की, याला कृपाळुदेवांचा धर्म समजला आहे तो कृपाळुदेवांचा धर्म पाळत आहे. जोपर्यंत स्वत:चे दोष दिसत नाहीत तोपर्यंत काहीही समजलेले नाही.
क्रमिक मार्गात तर कधीही स्वतःला स्वतःचे दोष दिसतच नाहीत. 'दोष तर पुष्कळ आहेत पण आम्हाला दिसत नाहीत.' असे जर कोणी म्हणाले तर मी मानेल की तू मोक्षाचा अधिकारी आहेस.' पण जर असे म्हणत असेल की माझ्यात दोन-चार दोषच आहेत, तर तो अनंत दोषांनी भरलेला आहे आणि सांगतो की दोन चारच आहेत! तुला तुझे दोन-चार दोषच दिसतात म्हणून काय तेवढेच दोष तुझ्यात आहेत असे तू मानतोस?
महावीर भगवंताचा मार्ग प्राप्त केला असे केव्हा म्हणता येईल? जेव्हा दररोज स्वत:चे शंभर-शंभर दोष दिसतील, रोजचे शंभर-शंभर प्रतिक्रमण होतील, त्यानंतर महावीर भगवंताच्या मार्गात आला असे म्हटले जाईल. 'स्वरुपाचे ज्ञान' तर अजून याहून कितीतरी दूर आहे पण हा तर चार पुस्तके वाचून 'स्वरुप' प्राप्त केल्याच्या नशेत फिरत असतो. यास तर स्वरुपाचा एक अंश सुद्धा प्राप्त केलेला नाही असे म्हटले जाईल.