________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
की हा तर खूप साधाभोळा आहे, सर्व उघड करुन टाकेल. आम्ही तर (दोषांना) सरळ सांगितले की, आम्ही दुसऱ्यांसमोर सर्व उघड करुन टाकू. ओपन टु स्काय (पूर्ण उघड) करुन टाकू. तेव्हा सर्व दोष निघून गेले. तेव्हा सर्व दोष विलय होतात.
__ चूक संपविण्याची पद्धत... तुमच्या किती चुका होत असतील? प्रश्नकर्ता : दोन-चार-पाच होत असतील!
दादाश्री : कोण न्याय करतो? ही चूक आहे, असा न्याय करणारा कोण?
प्रश्नकर्ता : नुकसान होते तेव्हा वाटते की चूक केली आहे.
दादाश्री : तेव्हा तुमच्या लक्षात येते, नाही का? पण यात न्याय करणारा कोण? चूक करणारा मनुष्य लगेच चूक मान्य करत नाही. न्याय करणारा मनुष्य जेव्हा म्हणेल की ही तुझी चूक आहे, तेव्हाच त्याच्या लक्षात येते. तेव्हा मान्य करतो. नाही तर मान्य करत नाही. या जगात कोणीही आपली चूक मान्य करीत नाही. पण जर त्याला समजले तर मान्य करतो. चुकांना शुट ऑन साइट (पाहताक्षणी ठार) केले पाहिजे. नाही तर चुका कमी होतच नाहीत. तुमच्या गावी कोणी चुका मान्य करतो का?
प्रश्नकर्ता : मान्य नाही करत.
दादाश्री : हो. कोणीच मान्य करत नाही. हे बघा, अकलेच्या गोण्या, विकायला गेलो तर चार आणेही मिळणार नाहीत. अकलेच्या गोण्या, विकायला गेलो तर पैसे मिळतील का? सर्वच अक्कलवाले, हिंदुस्तानात तर सर्वच अक्कलवाले, तेव्हा कोण पैसे देईल? तुमच्या गावी कोणीच चूक मान्य करत नाही ना? आणि तू लगेच चूक मान्य करतोस का?