________________
जग निर्दोष जगाला निर्दोष कशा प्रकारे पाहू शकतो?! आत्मदृष्टीनेच, पुद्गल दृष्टीने नाही! तत्त्वदृष्टीनेच, अवस्था दृष्टीने नाही!
समोरच्याला दोषी पाहतो, तो अहंकार आहे पाहणाऱ्याचा! शत्रूसाठी सुद्धा भाव बिघडवत नाही आणि जर भाव बिघडलेच तर लगेच प्रतिक्रमणाने सुधारुन घेतो, तेव्हाच पुढची प्रगती होते आणि शेवटी शीलवान होऊ शकतो.
__ सुरुवातीला तर बुद्धी समोरच्याला निर्दोष पाहू देत नाही पण तरीही निर्दोष पाहण्याची सुरुवात केली पाहिजे. नंतर जसजसे अनुभवास येईल, तसतशी बुद्धी शांत होते.
जसे गणिताचा प्रश्न सोडवताना, उत्तर मिळवण्यासाठी एक संख्या धरावी लागते, 'समजा १००' ही संख्या मनात धरली तर खरे उत्तर मिळते ना?! त्याचप्रमाणे दादाश्री सुद्धा एक संख्या (मनात) धरण्यास सांगतात की, 'या जगात कोणीही दोषी नाहीच. संपूर्ण जग निर्दोष आहे! तर शेवटी खरे उत्तर मिळेलच.
जशी दृष्टी तशी सृष्टी. दोषित दृष्टीने समोरचा दोषी दिसतो. आणि निर्दोष दृष्टीने समोरचा निर्दोष दिसतो.
ज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा 'हे जग निर्दोष आहे' हे अनुभवास येत नाही. तिथे तर दादाश्रींनी सांगितले आहे म्हणून आपण असे निश्चित करायचे की, 'जग निर्दोष आहे.' ज्यामुळे मग कोणीही दोषी दिसणार नाही. जिथे हे निश्चित झाले नसेल त्याठिकाणी मग असेच मानावे की हे जग निर्दोषच आहे! उत्तर माहीत असले म्हणजे मग उदाहरण सोडवणे सोपे होऊन जाते ना! प्रतीतीत तर शंभर टक्के ठेवावे की हे जग निर्दोषच आहे. दोषित दिसते ती भ्रांती आहे आणि त्यामुळे संसार टिकून राहिला आहे!