________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
न समजल्याने उभे केले दुःख
या जगातील सर्व दुःखं नासमजुतीमुळेच आहेत. दुसरे जे काही दुःखं आहे ते सर्व नासमजुतीमुळेच आहे. हे सर्व स्वतःच उभे केले आहेत, न दिसल्यामुळे! भाजलेल्याला जर कोणी विचारले की 'भाऊ, तुम्हाला कसे भाजले?' तेव्हा तो म्हणेल 'चुकून भाजलो, मी काय मुद्दाम भाजून घेणार? अशी ही सर्व दुःखं चुकांमुळेच आहेत. सर्व दुःखं आपल्याच चुकांचाच परिणाम आहे. चूक संपली की झाले !
प्रश्नकर्ता : कर्म चिकट असतात, त्यामुळे आपल्याला दुःख भोगावे लागते का?
दादाश्री : आपणच कर्म केलेली आहेत म्हणून आपलीच चूक आहे. दुसऱ्या कुणाचाही दोष नाहीच या जगात. दुसरे तर फक्त निमित्त आहेत. दुःख तुमचे आहे आणि ते समोरील निमित्ताच्या हातून दिले जात आहे. सासरा वारल्याचे पत्र पोस्टमन देऊन गेला तर त्यात त्या पोस्टमनचा काय दोष ?
समोरचा तर आहे मात्र निमित्त
आपल्याला घराची अडचण असेल तेव्हा एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली आणि राहण्यासाठी घर दिले तर अशावेळी जगातील लोकांना त्याच्यावर राग (मोह, आसक्ती) उत्पन्न होतो आणि जेव्हा तीच व्यक्ती घर परत मागेल तेव्हा त्याच्यावर द्वेष उत्पन्न होतो. हा राग-द्वेष आहे. आता खरे पाहता यात राग-द्वेष करण्याची गरजच नाही, तो तर निमित्त आहे. देणारा आणि घेणारा, दोन्हीही निमित्तच आहेत. तुमच्या पुण्याचा उदय असेल तेव्हा तो देण्यासाठी भेटतो आणि पापाचा उदय असेल तेव्हा परत घेण्यासाठी भेटतो. त्यात त्याचा काहीच दोष नाही. तुमच्या उदयाच्या आधारावर आहे. त्यात समोरच्या व्यक्तीचा किंचितमात्रही दोष नाही. तो तर मात्र निमित्त आहे, असे आपले ज्ञान सांगते. किती सुंदर गोष्ट सांगते!!