________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
अज्ञानीला तर कोणी गोड-गोड बोलले, तर त्याच्यावर राग (अनुराग) होतो आणि कोणी कडू बोलले तर द्वेष होतो. समोरचा गोड बोलतो ते स्वतःचे पुण्य प्रकाशित होत आहे आणि कडू बोलतो ते स्वत:चे पाप प्रकाशित होत आहे. म्हणून मुळात त्या समोरील दोन्हीही व्यक्तींना काही देणेघेणे नाही. कडू-गोड बोलणाऱ्याला काही देणेघेणे नाही. तो फक्त निमित्तच असतो. जो यशाचा निमित्त असेल, त्याच्याकडून यश मिळत राहते. आणि अपशयाचा निमित्त असेल त्याच्याकडून अपयश मिळत राहते. तो तर मात्र निमित्तच आहे, त्यात कुणाचाही दोष नाही.
प्रश्नकर्ता : सर्व निमित्तच म्हटले जातात ना?
दादाश्री : हो, तेही निमित्तच आहे. निमित्ताशिवाय या जगात दुसरी कोणतीही वस्तू नाही.
प्रश्नकर्ता : बाजारातून इथे सत्संगात आलो यात कोणते निमित्त?
दादाश्री : तो तर कर्माचा उदय आहे. यात निमित्ताचा काही प्रश्नच उद्भवत नाही. बाजारातील कर्माचा उदय पूर्ण झाला म्हणून या कर्माचा उदय इथे सुरु झाला, त्यामुळे आपोआपच विचार येतो की चला तिथे सत्संगला जाऊ. निमित्त केव्हा म्हटले जाईल? तुम्ही येथे येण्यासाठी निघालात, दादर स्टेशनला उतरलात आणि थोडे चालल्यानंतर कोणी रस्त्यात भेटले आणि ते तुम्हाला म्हणाले 'भाऊ, इथून परत फिरा, चला माझे महत्त्वाचे काम आहे. तेव्हा आपण समजावे की हे निमित्त आले. नाही तर चालती गाडी, कर्माच्या उदयाप्रमाणे चालतच राहते.
टोचत नाहीत बोल, दोषाशिवाय प्रश्नकर्ता : कोणी आपल्याला काही ऐकवून जातो ते सुद्धा नैमित्तिकच आहे ना? आपला दोष नसेल तरीही बोलत असेल तर?
दादाश्री : आपला दोष नसेल आणि कोणी काही बोलेल, असे बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही. जगात कुठल्याही मनुष्याला तुमचा