________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
१३
तुमचा जो हिशोब होता तो फेडताना नवीन हिशोबाची खातेवही चालू केली. एक शिवी उधार होती, तीच तो परत करण्यासाठी आला होता, तर तुम्ही ते जमा करुन घ्यायची होती, त्या ऐवजी तुम्ही नवीन पाच शिव्या दिल्या. ही एक शिवी तर तुम्हाला सहन होत नाही आणि वरुन पाच शिव्या उधार दिल्या. आता इथे मनुष्याची बुद्धी कशी काय पोहोचू शकेल? उधारी करुन उलट गुंतागुंत वाढवतो. नवीन गुंता निर्माण करतो.
आम्ही पंधरा वर्षांपासून उधार देत नाही म्हणून तर एवढे सारे हिशोब पूर्ण झाले ना! उधार देणेच बंद केले! फक्त जमाच करा. 'यांना' (स्वत:ला) सांगितलेलेच होते, की जमा करुन टाका. सोपे आहे ना, मार्ग सोपा आहे ना? आता हे शास्त्रांमध्ये लिहिलेले नसते.
कोणी काहीच करु शकत नाही. तुम्ही स्वतंत्र आहात. तुमचे वरिष्ठ कोणीच नाही. भगवंत सुद्धा वरिष्ठ नाहीत तेव्हा मग काय! भगवंतांच्या नावाने तुम्ही आश्वासन घेता की भगवंत आपल्यावर दया करतील! 'पुढचे पुढे बघू' असे बोलून चुकीचे काम करता, जबाबदारी ओढवून घेता!
ज्ञानींना भोगावे लागत नाही कुणालाही आपल्याकडून किंचितमात्रही दुःख झाले तर समजावे की आपली चूक आहे. आपल्या आतील परिणाम वर-खाली झाले म्हणजे चूक आपली आहे, असे समजते. जेव्हा समोरील व्यक्ती भोगते, तेव्हा त्याची चूक तर प्रत्यक्ष आहेच परंतु निमित्त आपण बनलो, आपण त्याला रागावलो म्हणून आपली सुद्धा चूक आहे. दादांना का भोगावे लागत नाही? कारण त्यांची एकही चूक उरली नाही. आपल्या चुकीमुळे समोरच्या व्यक्तीवर कोणताही परिणाम झाला (थोडे जरी दुःख झाले) आणि जर काही उधारी झाली तर लगेचच मनात माफी मागून जमा करुन घ्यावी. आपल्यात क्रोध-मान-माया-लोभरुपी कषाय आहेत, त्यामुळे उधारी झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून अशा वेळी जमा करुन घ्यावे. आपल्याकडून चूक झाली असेल तर उधारी होते पण आपण लगेचच