________________
१६
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
बंद करा कषायांचे पोषण एखाद्या व्यक्तीला चूक रहित व्हायचे असेल तर आम्ही त्याला सांगतो की, फक्त तीनच वर्ष क्रोध-मान-माया-लोभ यांना जेवण (पोषण) देऊ नको. तेव्हा ते सर्व मरतुकडे होऊन जातील. चुकांना जर फक्त तीनच वर्ष खाऊ घातले नाही तर त्या घर बदलून टाकतील. दोष म्हणजेच क्रोध-मान-माया-लोभाचे रक्षण करणे (त्यांची बाजू घेणे.) फक्त तीनच वर्ष त्यांचे कधीच रक्षण केले नाही तर त्या पळून जातात.
ज्ञानी पुरुषांनी दाखवल्याशिवाय मनुष्याला स्वत:च्या चुकांची जाणीव होत नाही. अशा तर अनंत चुका आहेत. ही एकच चूक नाही. अनंत चुकांनी आपल्याला घेरले आहे.
प्रश्नकर्ता : पण जास्त चुका दिसत नाहीत. थोड्याशाच दिसतात.
दादाश्री : इथे सत्संगात बसल्याने आवरण तुटत जातात, त्यामुळे मग दोष दिसतात.
प्रश्नकर्ता : जास्त दोष दिसावेत यासाठी जागृती कशी येते?
दादाश्री : आपल्या आत जागृती तर खूप आहे पण दोषांना शोधण्याची भावना झालेली नाही. पोलिसाला जेव्हा चोराला शोधण्याची इच्छा होते तेव्हा चोर सापडतो. पण जर पोलिस म्हणत असेल की, 'चोराला पकडण्याची काही गरज नाही, तो जेव्हा हाती लागेल तेव्हा पकडू.' मग काय, चोराची तर मजाच झाली ना? या चुका तर लपून बसलेल्या आहेत, त्यांना शोधल्यावर लगेच पकडल्या जातात.
संपूर्ण कमाईचे फळ काय? तुम्हाला जर तुमचे दोष एका पाठोपाठ एक दिसू लागले तरच खरी कमाई केली असे म्हटले जाईल. हा सगळा सत्संग स्वत:चे सर्व दोष पाहावे यासाठीच आहे. आणि जेव्हा स्वत:चे दोष दिसतील तेव्हाच जातील. दोष केव्हा दिसतील? जेव्हा स्वतः 'स्वयं' होईल, 'स्वस्वरुप' होईल तेव्हा. ज्याला स्वत:चे दोष जास्त दिसतात तो